Alum benefits for skin : तुरटी त्वचा आणि केसांसाठी फार फायदेशीर मानली जाते. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी रामबाण उपाय ठरते. आज आम्ही तुम्हाला तुरटीचा एक खास उपाय सांगणार आहोत. तुरटीमध्ये दोन गोष्टी मिक्स करून त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील.
तुरटी आणि गुलाब जल
तुरटीच्या पावडरमध्ये गुलाब जल किंवा साधं पाणी मिक्स करून चेहऱ्यावर मास्कसारखं १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर थोडं पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्याची मालिश करा. याने चेहरा उजळेल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील.
तुरटी आणि मुलतानी माती
हे तयार करण्यासाठी एक मोठा चमचा तुरटी पावडर घ्या, २ मोठे चमचे मुलतानी माती घ्या आणि १ मोठा चमचा दूध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर मास्कसारखं लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
तुरटीचे फायदे
- तुरटी चेहऱ्यावर लावल्याने तुमचे सुजलेले डोळे बरे होऊ शकतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात.
- तुरटीमध्ये त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.
- तसेच यात काही असे तत्व असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतात. या तेलामुळे त्वचेवर पिंपल्स येतात.
- ग्लिसरीन यात मिक्स केल्याने त्वच चांगली आणि स्वच्छ राहते. त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो.
तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
- तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये अनेक महत्वाचे तत्व असतात. जे घासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. तुरटीमधील तत्व आणि खोबऱ्याच्या तेलातील तत्व बेस्ट स्किन टोनसारखे काम करतात.
- तुरटी आणि खोबऱ्याच्या मिश्रणाने पिंपल्स दूर करण्यासही मदत मिळते. तुरटीमधील अॅंटी-सेप्टीक गुण इन्फेक्शन रोखण्यास मदत करतात. तर खोबऱ्याचं तेल हीलिंगचं काम करतं.
- खोबऱ्याच्या तेलामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांमध्ये होणारं इन्फेक्शन दूर करतात. सोबतच केसांना मुलायम करण्याचं काम करतात.
- सोबतच केसांना याचं मिश्रण लावल्याने कोजेजनचं उत्पादन अधिक होतं. याने केस काळे राहण्यास मदत मिळते आणि केस पांढे होत नाहीत.