Hair Growth: केस मजबूत आणि सुंदर ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आणि प्रदूषण यामुळे अनेकांना कमी वयातच केसगळती किंवा केस पांढरे होण्याची समस्या होते. वेगवेगळ्या केमिकल्सचा वापरही यासाठी कारणीभूत असतो. अशात शेवगा तुम्हाला केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतो. याने केस मुळापासून मजबूत होतात, सोबतच केसगळतीची समस्याही दूर होते. चला जाणून घेऊ कसा कराल शेवग्याचा वापर...
केसांसाठी शेवगा कसा वापरावा?
शेवग्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. शेवग्याची पाने, फुले, शेंगामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. जे केसांना हेल्दी ठेवण्याचं काम करतात.
शेवग्याचं पावडर
एक्सपर्टनुसार, केस मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी शेवग्याच्या पावडरचा तुम्ही वापर करू शकता. यात फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. जर शेवगा केसांवर लावण्यासोबतच याचा आहारातही समावेश केला तर शरीरालाही पोषण मिळते. शेवग्याच्या पावडरचं सेवन तुम्ही स्मूदी किंवा भाजी बनवण्यासाठी करू शकता.
शेवग्याचं तेल
केसांची वाढ होण्यासाठी शेवग्याच्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल तुम्ही घरीच तयार करू शकता. ५० मिली खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेलात १ चमचे शेवग्याचं पावडर मिक्स करा. हे तेल एका बॉटलमध्ये टाकून उन्हात ठेवा. २ ते ३ दिवसात शेवग्याचं पावडर बॉटलमध्ये खाली बसेल. त्यानंतर तेल एखाद्या दुसऱ्या बॉटलमध्ये काढून घ्या. त्यात रोजमेरी ऑइलचे ५ थेंब टाका. तुमचं शेवग्याचा तेल तयार आहे. या तेलाचा वापर केस धुण्याच्या दोन तासांआधी करावा. रात्रीही या तेलाने डोक्याची मालिश करू शकता.
हेअर मास्क
शेवग्याचा हेअर मास्कही केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. तो तयार करण्यासाठी ४ चमचे शेवग्याच्या पावडरमध्ये २ चमचे दही आणि १ चमचा मध मिक्स करून हेअर मास्कची पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर ३० ते ४० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर शाम्पू केस धुवून घ्या. नियमितपणे याचा वापर केला तर केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतील.