बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढणं ही एक गंभीर समस्या झाली आहे. अनेकांना वाढलेलं वजन कमी करायचं. वजन वाढल्याने डायबिटीज, हृदयविकार आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय सांगत आहोत. तुमचाही विश्वास बसणार नाही पण वजन कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची मदत होती.
गुलाबाच्या पाकळ्यांनी वजन करा कमी
गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने तुम्ही फॅट कमी करु शकता. गुलाबात लॅक्सेटिव आणि ड्यूरेटिक गुण असतात. जे मेटोबॉलिज्मला वाढवतात, पोट साफ ठेवतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे तुमचं वजन कमी होतं. त्यासोबतच गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या स्कीनसाठीही फायद्याच्या आहेत. याने तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो कारण गुलाबाच्या पाकळ्यांनी रक्त शुद्ध होतं.
असा करा गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज गुलाबाच्या पाकळ्या खाव्यात. रोज गुलाबाच्या 20 पाकळ्या पाण्यात उकळून मधात मिश्रित करा. आणि दोन दिवसांनी ते पाणी प्यावे. हे मिश्रण तयार करण्यासाठी आधी एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. पाण्याचा रंग लाल होईपर्यंत पाणी उकळवा. त्यात चिमुटभर वेलची पावडर आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण गाळून दिवसातून दोनदा सेवन करा.