केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतं. सुंदर आणि मुलायम केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. परंतु अनेकदा खराब लाइफस्टाइल आणि अनहेल्दी खाण्यामुळे केसांशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकांचे केस फार कमी वयातच पांढरे होतात. चारचौघात डोक्यावर पांढरे केस दिसले तर अनेकदा मान शर्मेने खालीही जाते. यामुळे अनेकजण केस तोडून टाकतात. पण ते केस तोडल्यामुळे पुन्हा नव्याने काही पांढरे केस येतात. 'अमेरिकेतील हेअर रेस्टोरेशन सर्जन रॉबर्ट डोरिन' यांनी सांगितले की, पांढरे केस तोडल्याने केसांची वढ खुटंते आणि केस रूक्ष आणि कोरडे होतात. त्यामुळे पांढरे केस तोडण्याऐवजी केसांची उत्तम पद्धतीने काळजी घेता येऊ शकते.
लिंबाचा रस आणि आवळा
पांढऱ्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या पावडरच्या ज्यूसचं सेवन करू शकता. यासाठी सर्वात आधी आवळ्याच्या पावडरमध्ये लिंबाचा रस एकत्र करून घ्या आणि तयार पेस्ट केसांना लावा. तसेच डोक्याच्या त्वचेलाही या पेस्टच्या मदतीने मसाज करा. काही दिवसांपर्यंत असं केल्याने लवकरच आपले पांढरे केस काळे होऊ शकतात.
कांद्याची पेस्ट
कांद्याची साल काढून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावल्यानंतर 30 मिनिटांनी केस धुवून टाका. कांद्याचा गंध दूर करण्यासाठी केस धुताना शॅम्पूही लावू शकता.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
केसांचं आरोग्य राखण्यासाठी खोबऱ्याच्या तेलामध्ये लिंबाचा रस एकत्र करून केसांना दररोज मसाज करा. यामुळे फक्त केसचं काळे होणार नाहीत तर केस मुलायम आणि सुंदरही होतील.
तिळ आणि बदामाचे तेल
बदामाचे तेल आणि तीळाचे मिश्रण केसांना आणि डोक्याच्या त्वचेवर लावून 20 ते 30 मिनिटांसाठी लावून तसचं ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या घरगुती उपायाचा वापर केल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.