(Image Credit : oureverydaylife.com)
केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणे गरजेचं असतं. केस मजबूत आणि दाट करण्यासाठी तुम्हाला त्यांच्यानुसारत शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करावा लागतो. अनेकजण कंडीशनरचा वापर करतात. पण याचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाच्या ठरतात. चला जाणून घेऊन कंडीशनरत्या फायद्यांबाबत आणि त्याच्या वापराबाबत...
१) कंडीशनरमुळे फॉलिकल्स हायड्रेट होतात - हेअर कंडीशनरमुळे हेअर फॉलिक्स हायड्रेट होतात. तसेच याने डोक्याची त्वचा चांगली राहण्यासही मदत मिळते. जर तुमचे केस दिवसेंदिवस शुष्क होत असतील तर तुम्ही कंडीशनरचा वापर करायला हवा.
२) केसांनुसार कंडीशनर - प्रत्येक प्रकारच्या केसांसाठी वेगवेगळे कंडीशनर बाजारात मिळतात. तुमच्या केसांच्या टेक्सचरनुसार कंडीशनरचा वापर करावा. याने केस मॉइश्चराइज होण्यास मदत मिळते.
३) शॅम्पू विनाही कंडीशनरचा वापर करू शकता - जर तुम्हाला केस धुण्याची इच्छा नसेल तर त्याशिवायही तुम्ही कंडीशनरचा वापर करू शकता. कंडीशनरचा वापर केसांची स्वच्छता करण्यासाठी केला जाऊ शकतो.
४) जास्त कंडीशनर हानिकारक - केसांच्या गरजेनुसार त्यांना कंडीशनर करणे गरजेचं असतं. पण जास्त प्रमाणात कंडीशनर वापर करणेही तुमच्या केसांसाठी घातक ठरू शकतं. जर कंडीशनरच्या वापरानंतर केस खराब होत असतील तर वेळीच याचा वापर थांबवा.
५) कंडीशनर हेअर स्टायलिंगसारखंही काम करतं - हेअर कंडीशनरचा वापर तुम्ही स्टायलिंग प्रॉडक्टसारखाही करू शकता. थोडं कंडीशनर केसांवर लावून कंगव्याने केस बांधा. काही वेळाने केस मोकळे करा. याने केस चांगले होतात.
शॅम्पू आणि कंडीशनरचा असा करा वापर
बाजारामध्ये शॅम्पू आणि कंडीशनर अनेक प्रकारचे असतात. मॉइस्चराइजिंग, स्मूथनिंग इत्यादी. केसांची कोणतीही समस्या असेल तरिही तुम्ही दोन्ही एकाच ब्रँडचे असणे गरजेचे आहे. जर तुमच्या टाळूची त्वचा ड्राय आणि केसांचा पोत चांगला असेल तर त्यासाठी मॉइस्चराइजिंग शॅम्पू हा उत्तम पर्याय आहे. पण मॉइस्चराइजिंग शॅम्पू आणि कंडीशनर दोन्हींचा वापर केल्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. तुम्ही शॅम्पूची निवड तुमच्या टाळूची त्वचा, केसांचा प्रकार, केमिकल ट्रीटमेंट यांनुसार करावी.