प्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण यांचा फारस फायदा होत नाही. आज आम्ही काही घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने पिंपल्स दूर करणं शक्य होतं.
का येतात चेहऱ्यावर पिंपल्स?
पिंपल्स किंवा पूरळ चेहऱ्यावर येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स होतात. त्यामुळे चेहऱ्याचा लूक बिघडतो. तसेच अनेकदा पिंपल्स गेल्यानंतर त्या ठिकाणी अॅक्ने म्हणजेच काळे डाग राहतात. ज्या व्यक्ती उन्हामध्ये बाहेर पडतात. त्यांना सतत येणाऱ्या घामामुळेही पिंपल्स होतात. एवढचं नाहीतर पचनक्रिया सुरळीत नसेल तर किंवा पोटाच्या समस्यांमुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच ज्या लोकांची त्वचा जास्त ऑयली असते. त्यांना पिंपल्सचा सतत सामना करावा लागतो.
घरगुती उपचारांनी करा पिंपल्स दूर
चंदनाचा फेसपॅक
अनेकदा त्वचेचा तेलकटपणा वाढल्यामपळे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवते. यासाठी चंदनाचा फेसपॅक उत्तम ठरतो. त्यासाठी गुलाब पाण्यामध्ये थोडी चंदनाची पावडर एकत्र करा आणि ती चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.
लिंबू ठरतं फायदेशीर
चेहऱ्यावरील घाण दूर करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर ठरतं. पिंपव्स दूर करण्यासाठी लिंबाचे दोन तुकडे करून चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्र ओपन होण्यास मद होते. लिंबामध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात. जे पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतात.
मधाचा करा वापर
पिंपल्स दूर करण्यासाठी सर्वात फायदेशीर घरगुती उपाय म्हणजे मध. पिंपल्स दूर करण्यासाठी मध चेहऱ्यावर 30 मिनिटांसाठी लावून तसचं ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे पिंपल्समुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी
पोटाच्या समस्यांमुळेही पिंपल्स येण्याची समस्या वाडते. यासाठी इतर उपायांसोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करा. त्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्टाची समस्या दूर होते. सतत याच्या सेवनाने चेहऱ्यावर पिपंल्स दूर होण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.