बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम. सध्या यामी बॉलिवूडमध्ये आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी यामीने आपला आगामी चित्रपट 'उरी' साठी नवीन हेअर कट केला आहे. यामीने आपले लांबसडक केस कापले असून बॉब कट केला आहे.
यामीने आपले केस कापले असले तरीही ती आपल्या केसांसोबत एक्सप्रिमेंट करत असल्याचं दिसून येत आहे. ज्या मुलींचे केस छोटे असतात. त्यांना नेहमी केसांची हेअरस्टाइल करताना फार विचार करावा लागतो. छोट्या केसांमुळे बऱ्याचदा कोणत्या हेअरस्टाइल कराव्यात याबाबत अनेक प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभे असतात. असेच प्रश्न तमच्यासमोर उभे राहत असतील तर तुम्हीही यामीच्या हेअर स्टाइल ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला स्टनिंग लूक मिळण्यासह मदत होईल.
जर तुमचे केस यामीसारखेच छोटे असतील तर प्रत्येकवेळी त्यांना नवीन लूक देण्याचा प्रयत्न करा. यामीसारखे केस स्ट्रेट करा.
जर तुम्हाला स्ट्रेट केस करायचे नसतील तर हेअरस्टाइल ट्राय करा. यामीप्रमाणे फ्रंट साइटच्या केसांना घेऊन फ्रेंच बनवा. ही हेअर स्टाइल सध्या ट्रेन्ड करत आहे. त्यामुळे तुम्हाला गर्लिश लूक मिळण्यास मदत होइल.
हाफ बनचा लूकही तुम्ही ट्राय करू शकता. जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्ही यामीप्रमाणे फ्रंट हेअर घेऊन छोटा बन घाला आणि उरलेले केस मोकळे सोडा.
हेअर जेलचा वापर करून तुम्हीही यामीप्रमाणे रेट्रो लूक ट्राय करू शकता.
गर्लिश हेअरस्टाइल करायची असेल तर यामीप्रमाणे आपल्या सेंटरच्या केसांची फ्रेंच स्टाइल आणि त्यांना मागच्या बाजूला पिनअप करा.
छोट्या केसांना साइड हेअर केलेलंही सुंदर दिसतं. ज्यामुळे थोडा कर्ली लूक मिळण्यास मदत होईल.