सणासुदीत असे वाढवा सौंदर्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 5:51 PM
सण-उत्सव आले की, प्रत्येक महिलेला वाटते की आपण सुंदर दिसावे.
सण-उत्सव आले की, प्रत्येक महिलेला वाटते की आपण सुंदर दिसावे. मात्र बाह्य वातावरण व प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होऊन सौंदर्यात बाधा निर्माण होते. आपले सौंदर्य टिकविण्यासाठी बऱ्याच महिला सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. प्रत्येकीला पार्लरमध्ये जाणे शक्य नाही. यासाठी सणासुदीत घरच्या घरी सौंदर्य कसे वाढविता येईल याबाबत काही टिप्स...क्लिन्झिंगत्वचा क्लिन होण्यासाठी प्रथम क्लिन्झिंग वापरा. यासाठी हातावर क्लिन्झिंग घेऊन हाताने चेहऱ्यावर गोलाकार फिरवा. यामुळे त्वचेवरील माती, धूळ तसेच मृतपेशी नाहीशा होतील व त्वचेला चकाकी येईल. एक्सफॉलिएटबऱ्याचदा क्लिन्झिंग केल्यानंतरही मृत पेशी असतातच. अशावेळी तुमच्या त्वचेनुसार मऊ एक्सफॉलिएट पावडर घेऊन त्वचेवर प्रयोग करा. सामान्य एक्सफॉलिएट पावडरचा वापर केलेला सर्वोत्तम ठरेल. फेस मास्कचेहऱ्यावर चकाकी येऊन सौंदर्य खुलविण्यासाठी अॅँटीआॅक्सीडेंट्स आणि विटॅमिनयुक्त मास्क चेहºयाला लावा. दोन चमचे मधात अर्धा कप पपईचा गर मिक्स करुन पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावून पाच मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यानंतर मॉयश्चरायजर लावा.सीरम मास्क काढल्यानंतर हातावर ४-५ थेंब हायड्रा ब्यूटी सीरम घेऊन बोटांनी हे चेहऱ्यावर लावा. एसपीएफ क्रीमसर्वात शेवटी १५ एसपीएफयुक्त आयक्रीम आणि अॅडी एजिंग क्रीम लावा. मग पाहा, घरच्या घरी कसा चमकेल तुमचा चेहरा.