आपल्या वाढणाऱ्या वयाचा अंदाज आपल्याला सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. खासकरून चेहऱ्यावरील डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं, त्वचेला येणारी सूज, डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या वाढणं इत्यादी वस्तू दिसू लागतात. मग तुम्ही कितीही कॉस्मेटिक किंवा मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा, त्याचा काहीही फायदा होत नाही.
परंतु एका जपानी पद्धतीने आपले डोळे पुन्हा आधीसारखे सुंदर आणि मोठे दिसण्यासाठी मदत करतात. या जपानी पद्धतीला 'शियात्सु मसाज' असं म्हणतात. या पद्धतीने करण्यात येणऱ्या मसाजमुळे डोळ्यांच्या सुरकुत्या आणि सूज यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत होते. जाणून घेऊया हा मसाज करण्याची पद्धत...
सर्वात आधी आयब्रोजपासून सुरूवात करा
दोन्ही हातांची पहिलं, मधलं बोट आणि रिंग फिंगरने आपल्या आयब्रोजवर प्रेशर टाका. असं एकूण 7 सेकंदांसाठी करा. आयब्रोजवर प्रेशर दिल्याने डोळे वरच्या दिशेला लिफ्ट होतील.
डोळ्यांच्या कोपऱ्यांवर प्रेशर द्या
डाव्या डोळ्यांच्या कोपऱ्यावर आणि उजव्या डोळ्यांच्या कोपऱ्यावर दोन्ही हातांचं रिंग फिंगर ठेवा. दोन्ही कोपऱ्यांवर थोडेसे डोळे स्ट्रेच करा आणि त्यानंतर 3 सेकंदांसाठी प्रेशर द्या आणि त्यानंतर सोडून द्या. यामुळे डोळ्यांभोवतीचे रिंकल्स कमी होतात. ही एक्सरसाइज दिवसातून तीन वेळा करा.
डोळ्यांखालील सूज अशी कमी करा
हातांच्या पहिलं आणि मधल्या बोटाने 'V' शेप तयार करा. दोन्ही हात डोळ्यांखाली ठेवा आणि हलकसं प्रेशर द्या. 3 सेकंदांसाठी प्रेशर ठेवा त्यानंतर काढून टाका. पुन्हा 3 सेकंदांसाठी असचं करा. असं एकूण तीन वेळा करा.
डोळ्यांखालील त्वचा अशी करा ठिक
पफी आइज ठिक करण्यासाठी डोळ्यांखाली तीन बोटं ठेवून 10 सेकंदांसाठी प्रेस करा आणि काढून टाका. असं पुन्हा पुन्हा केल्याने सुरकुत्या नाहीशा होऊन स्किनमध्ये टाइटनेस येइल.