केवळ बटाटे खाऊन 32 किलो वजन घटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2016 12:58 PM
एका अवलियाने जवळपास तीन महिने केवळ बटाटे खाऊन 31 किलो वजन कमी केले.
शीर्षक वाचून बुचकळ्यात पडला ना? आहो पण जग हे अशा अचंबित करणाºया गोष्टींनी भरलेले आहे. वजन वाढ ही आजच्या युगारची फार मोठी समस्या आहे.वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ कार्बोदके असलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. सर्वप्रथम आहारातून बटाटा हद्दपार करण्याचा सल्ला दिला जातो. पण एका अवलियाने जवळपास तीन महिने केवळ बटाटे खाऊन 31 किलो वजन कमी केले.आॅस्ट्रेलियातील अँड्य्रू फ्लिंडर्स टेलर असे त्या अवलियाचे नाव आहे. बटाट्याचे विविध प्रकार खाऊन या महाशयांनी शंभर दिवसांत 70 पाऊंड्स (31 किलो) वजन घटवले. त्याच्या डाएटमध्ये व्हाईट बटाटे आणि रताळे अशा पदार्थांचा सामावेश होता.व्यायामाच्या बाबतीत बोलायचे तर, आठवड्यातून सहा दिवस तो नियमित एक्सरसाईज करायचा. जानेवारी महिन्यात त्याने अशा पद्धतीने वजन कमी करून दाखविण्याची घोषणा केली होती.त्यावर अनेक आरोग्यतज्ज्ञांनी शंका उपस्थित केली होती. परंतु सखोल तपासणीतनू त्याच्या डॉक्टरने टेलरला ‘फिट अँड फाईन’ घोषित केले. त्याच्या या कर्तबामुळे वेटलॉस प्रोग्राम तयार करणारे तर हैराण झाले आहेत.