(Image Credit : gumtree.sg)
सौंदर्य वाढविण्यामध्ये केसांची महत्त्वाची भूमिका असते. सध्या केसांना कलर करण्यापासून केस सरळ करणं यांसारख्या अनेक गोष्टी मुली करत असतात. अशातच केसांना रिबॉन्ड आणि स्मूदनिंग करण्याचा ट्रेन्ड पॉप्युलर होत आहे. साधारणतः ही ट्रिटमेंट कुरळ्या केसांवर करण्यात येते. परंतु ज्यांचे केस सरळ असतात अशा महिलाही सध्या केसांवर रिबॉन्डिंग करताना दिसतात. जाणून घेऊया रिबॉन्डिंग ट्रिटमेंट म्हणजे नक्की काय आणि त्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी यासाठी काही खास टिप्स...
काय आहे रिबॉन्डिंग?
हेयर रिबॉन्डिंग एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कुरळ्या किंवा मोठ्या केसांना केमिकल्सच्या मदतीने सरळ करण्यात येतं. दरम्यान केमिकल्सच्या वापरामुळे अनेकदा केस डॅमेज होतात. आपले केस अमिनो अॅसिडने तयार होत असतात आणि हे प्रोटीन्स अशा बॉन्ड्शी जुळलेले असतात जे आपल्या केसांचे स्ट्रक्चर ओळखण्यासाठी मदत करतात. म्हणजेच आपले केस कुरळे आहेत की, सरळ हे समजण्यास या बॉन्ड्समुळे मदत होते. रिबॉन्डिंग प्रक्रियेमध्ये केमिकल्सच्या मदतीने हे बॉन्ड्स तोडण्यात येतात. जेणेकरून केसांच्या स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन केल जाऊ शकत. त्यामुळे रिबॉन्डिंग केल्यानंतर केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
अशी घ्या केसांची काळजी :
1. रिबॉन्डिंग केल्यानंतर सर्वात आधी लक्षात ठेवा ती, काहीही झालं तरिही तुम्हाला तुमचे केस ओले करायचे नाहीत. कमीत कमी 3 दिवस केसांना त्याच अवस्थेत ठेवावं. जर तुम्ही केस धुतले तर ते व्यवस्थित सेट होणार नाहीत.
2. रिबॉन्डिंग केल्यानंतर केस मोकळेच ठेवा. केस बांधल्यामुळे त्यांचं स्टायलिंग खराब होतं. तुम्ही झोपत असाल तरिही केस मोकळेच ठेवा. म्हणजेच, केस अजिबात बांधू नका. त्यामुळे रिबॉन्डिंग खराब होऊन जातं.
3. रिबॉन्डिंगच्या 3 दिवसांनंतर जेव्हा केसांना शॅम्पू कराल त्यावेळी लक्षात ठेवा की, शॅम्पू केमिकल फ्री असावा. शॅम्पू केल्यानंतर चांगलं कंडिशनर केसांसाठी वापरा. काही वेळ असचं ठेवल्याने हलक्या हाताने मसाज करून केस व्यवस्थित धुवून टाका.
4. रिबॉन्डिंगच्या काही वेळानंतर केसांना अजिबात कलर करू नका. एकत्र केसांना अनेक प्रकारच्या केमिकल ट्रिटमेंट केल्याने केसांच्या समस्यांचा सामाना करावा लागू शकतो.
5. रिबॉन्डिंगनंतर केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. नेहमी थंड पाण्यानेच केस धुवा. जास्त थंड पाण्याने केस धुतल्याने त्रास होत असेल तरकोमट पाण्याचा केस धुण्यासाठी वापर करा.
6. डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवा. नियमितपणे गरम तेलाने केसांच्या मुळांना मालिश करा आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा शॅम्पूने केस धुवा. केस ओले असताना विंचरू नका. थोडा वेळ टॉवेल केसांना गुंडाळून ठेवा आणि त्यानंतर आरामात विंचरा.
7. आपल्या केसांना ऊन, धूळ-मातीपसून दूर ठेवा. दुपारच्या उन्हामध्ये स्कार्फ बांधून किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा.
टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.