अभिनेत्री करिना कपूर खान फक्त फॅशनिस्टा म्हणूनच नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. करिना आपल्या लूक्स आणि सौंदर्यामुळे अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. परंतु करिना स्वतःचं सौंदर्य जपण्यासाठीही फार मेहनत घेते. आज आम्ही तुम्हाला करीना कपूर खानचे काही ब्यूटी सिक्रेट्स सांगणार आहोत.
बदामाचं तेल
त्वचेसाठी किंवा केसांचं आरोग्य राखण्यासाठी करिना बदामाचं तेल वापरते. तिला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती व्यवस्थित मसाज करते. करिनाला बदामाचं तेल वापरण्याचा सल्ला तिची आई आणि आजीने दिला होता. त्यामुळे ती लहानपणापासूनच बदामाच्या तेलाचा वापर करते.
मध
आपल्या सर्वांनाच माहीत आहे मधामध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. हे सर्व त्वचेसाठी नॅचरल टोनरचं काम करतात आणि वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतो. करिना मधाचा प्रत्येकवेळी वापर करते. ती नियमितपणे मधाने त्वचेची मसाज करते.
पाणी
पाणी शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. त्यामुळेच डॉक्टर मुबलक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीर जेवढं जास्त हायड्रेट राहतं तेवढाच त्याला फायदा होतो. करिना दररोज 6 बाटल्या पाणी पिते. रिपोर्ट्सनुसार, ती पाण्याला 'नॅचरल ड्रग' समजते आणि तिचं म्हणणं आहे की, त्यामुळे केस आणि त्वचेचं रक्षण होण्यास मदत होते.
घरीच तयार करते फेसपॅक
करिना आपल्या त्वचेसाठी घरीच तयार केलेला फेसपॅक वापरते. फेसपॅक म्हणून करिना बदामाच्या तेलासोबत दही एकत्र करून लावते. दही नॅचरल ब्लीचिंग एजेंटप्रमाणे काम करतं आणि बदाम डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी तसेच पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत असणारं बॅक्टेरिया मारण्यासाठी मदत करतात.
मॉयश्चरायझर
मॉयश्चरायझर स्किनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. करिना मॉयश्चरायझरचा नेहमी वापर करते. ती दिवसातून कमीत कमी दोन वेळा आपला चेहरा पाण्याने स्वच्छ करते. तसेच दोन वेळा मॉयश्चरायझर लावते.
वर्कआउट
करिना नियमितपणे एक्सरसाइज करते. योग आणि पिलाटेशिवाय तिचं वर्कआउट होतचं नाही. त्यामुळेच करिना नेहमी जिम किंवा योग सेंटर जाताना स्पॉट होत असते.