(Image Credit : boldsky.com)
दूध सेवन करण्याचे फायदे तर तुम्हाला चांगलेच माहीत असतील. पण कधी आंघोळीच्या पाण्यात दूध मिश्रित करण्याचा विचार मनात आलाय का? जर आला नसेल तर तुम्हाला पाण्यात दूध मिश्रित करून आंघोळ करण्याचे फायदे माहीत असलेच पाहिजे. हे कधीच ट्राय केलं नसेल तर पुढच्या वेळी नक्की करा. यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, इतकं महाग दूध कसं वापरायचं तर दुधाचा वापर थोडाच करायचा आहे. एक बकेट पाण्यात एक कप दुधाने देखील फायदा होतो. तसेच तुम्ही ब्युटी प्रॉडक्टवर दुधापेक्षा जास्त पैसे खर्च करता.
बेबी सॉफ्ट त्वचेसाठी
(Image Credit : lifealth.com)
जर तुम्हाला बेबी सॉफ्ट त्वचा हवी असेल म्हणजे लहान मुलांसारखी मुलायम त्वचा हवी असेल तर एक बकेट आंघोलीच्या पाण्यात एक कप दूध मिश्रित करा. हा उपाय एक आठवडा केला तर त्वचा मुलायम होऊ लागेल. त्यासोबतच जर तुम्हाला ड्रायनेसची समस्या असेल तर ती सुद्धा याने दूर होऊ शकते.
चमकदार त्वचेसाठी
दुधात असलेल्या लॅक्टिक अॅसिडचे गुण नॅच्युरल एक्सफॉलिएटच्या रूपात काम करू लागतात. याने डेड स्कीन दूर होते आणि सेल्स रिपेअर होण्यासही मदत मिळते. तसेच याने त्वचा चमकदारही होते.
रॅशेज दूर होतात
त्वचेवर रॅशेज किंवा खाजेची समस्या असेल तर दूध मिश्रित पाण्याने आंघोळ केल्यास ही समस्या दूर होते. याने त्वचेवर होणारी इरिटेशन दूर होऊन शरीराला आराम मिळतो.
सनबर्न दूर करण्यासाठी
त्वचेवर अॅलोव्हेरा लावल्याने सनबर्न दूर होण्यास मदत मिळते. मात्र, जर त्यासोबतच आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध मिश्रित केलं तर फायदा अधिक वाढतो. याने सनबर्नचे डाग लवकर नाहीसे होण्यास मदत मिळते.
तरूण त्वचेसाठी
जर तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध मिश्रित करून आंघोळ केली तर त्वचा खुलून दिसेल. याने डेड स्कीन दूर होते, सेल्स रिपेअर होता आणि त्वचेला डीप नरिशमेंट मिळेल. त्यामुळे त्वचा आणखी तरूण दिसेल.