महिलांना केस गळणे, केसात कोंडा होणे तसंच स्काल्पवर इंफेक्शनच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. पण प्रदुषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे या समस्या वाढत जातात. केस चांगले ठेवण्यासाठी केसांना पोषण देणं गरजेचं आहे. फक्त तेल लावून चांगला शॅम्पु लावला म्हणजे केस गळणं थांबेल असं नाही. त्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करायला हवा.
केस व्यवस्थित ठेवण्यासाठी नेहमी महागडी उत्पादनं वापरायला हवीत असं नाही. तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करून केसांच्या समस्यांपासून लांब राहू शकता. आज आम्ही तुम्हाला बीयांचा आहारात समावेश केला तर केसांना कोणते फायदे होतात. याबाबत सांगणार आहोत. बीया बाजारात तुम्हाला सहज मिळतील आणि जास्त खर्च सुद्धा करावा लागणार नाही.
तिळाच्या बीया
तिळाच्या बीयांमध्ये व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. त्यासोबतच फॅटी एसिड्स सुद्धा असतात. ज्यामुळे शरीरातील कॉलेस्टॉलचं प्रमाण कमी होतं. केसांना सुद्धा तिळाच्या बीयांचे अनेक फायदे आहेत. तिळाच्या बीया खाल्याने केस जास्त मजबूत होतील. परिणामी केस गळणं थांबेल.
सुर्यफुलाच्या बीया
सुर्यफुलांच्या बीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओमेगा-३ एसिड आणि व्हिटामीन ई असतं. त्यात एंटीऑक्सीडेंटसुद्धा असतात. जे तुमच्या केसांसाठी चांगले असतात. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं.
भोपळ्याच्या बीया
भोपळ्याची भाजी आपण घरी आणत असतो. त्यावेळी त्यातील बीया वेगळ्या काढून त्या सुकवून तुम्ही केसांसाठी या बीयांचा चागंल्याप्रकारे वापर करू शकता. भोपळयाच्या बियांमध्ये मिनरल्स असतात. मॅग्निशियम, सिलेनियम, कॉपर, ऑयरन आणि कॅल्शियम असतं. केसांना चागंल ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. प्रोटिन्स केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात. या बीयांमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असतं. म्हणून तुम्ही या बीयांचा आहारात समावेश केला तर तुमच्या केसांच्या समस्या दूर होऊ शकतात. ( हे पण वाचा-खरं की काय? त्वचा आणि केसांसाठी फायद्याचं असतं घाम येणं, कसं ते वाचा...)
मेथीच्या बीया
मेथीच्या सेवनाचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, शारीरीक क्षमता कमी झालेल्या व्यक्तींना मेथीच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीराच झीज भरून निघते. मेथीच्या बीयांमध्ये पोटाशियम आणि अमिनो एसिड्स असातात. त्यामुळे मेथीचा समावेश आहारात केल्यामुळे केस गळणं थांबत आणि केसांची वाढ चांगली होते.( हे पण वाचा-मेकअप रिमुव्हरसाठी खर्च कशाला? घरीच तयार करून मिळवा चमकदार चेहरा)