(Image credit- be beautiful)
कटरीना कैफ, दिशा पाटनी आणि सलमान खान या अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे. आम्ही तुम्हाला या एक्टरर्सच्या सुंदर दिसण्यामागे काय कारण आहे. याचं सिक्रेट सांगणार आहोत. हे तीन ही स्टार आपल्या त्वचेला तजेलदार आणि तरूण ठेवण्यासाठी एक खास ब्युटी टिप फॉलो करतात. तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल पण हे टिव्हीचे स्टार बर्फाच्या पाण्याने चेहरा धूतात असं ऐकण्यात येत आहे. तर आज आम्ही तुम्हाला बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे सांगणार आहोत.
त्वचेची सुज घालवण्यासाठी
झोपल्यानंतर आपला चेहरा सुजलेला असतो. पण ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेर पडत असताना आपल्याला सुजलेला फेस आवडत नसतो. अशावेळी बर्फाच्या पाण्याचा वापर जर तुम्ही केलात तर काहीवेळात सुजलेले चेहरा नीट होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवरची सुज आणि थकवा निघून फ्रेश वाटत असतं. ( हे पण वाचा-चमकदार, टवटवीत त्वचेसाठी खास द्राक्षांचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील...)
पोर्स टाईट करण्यासाठी
गरम पाण्याचे चेहरा धुतल्यास त्वचेवर पोर्स ओपन होत असतात. याउलट जर तुम्ही थंड पाण्याचा चेहरा धुण्यासाठी वापर केलात तर पोर्स लहान होण्यासाठी मदत होते. त्यामुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या दूर होते. तसंच त्वचेला चांगला लूक सुद्धा येतो. ( हे पण वाचा-तेलकट त्वचेमुळे सतत काळपटपणा येतो? कमी खर्चात 'या' घरगुती उपायांनी उजळेल त्वचा)
फ्रेश लूकसाठी
बर्फाच्या पाण्यामुळे फक्त फ्रेश लुक येत नाही तर त्वचा बराच काळ फ्रेश राहते. त्यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. परिणामी त्वचेवरील सुरकुत्या सुद्धा कमी होतात. बर्फाचं पाणी चेहरा आणि मानेला वापरल्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे त्वचा निस्तेज झाली असेल तर फरक दिसून येतो.
काळपटपणा दूर करण्यासाठी
त्वचा चांगली आणि गुलाबी, टवटवीत दिसते. बर्फाच्या पाण्यामुळे सनटॅन दूर होतं. तसंच बाहेरच्या वातावरणामुळे सुद्धा त्वचा खराब होत असते. त्यामुळे त्वचेवर असेलेला काळपटपणा दूर करण्यासाठी बर्फाचं पाणि फायदेशीर ठरत असतं.
तेलकट त्वचेची समस्या दूर होते.
तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बर्फाच्या पाण्याशिवाय चांगला पर्याय शोधून सुद्धा सापडत नाही. बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहरा चांगला राहतो. शिवाय पोर्स बंद झाल्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल सुद्धा येत नाही.
बर्फाचा त्वचेवर वापर करण्यासाठी साध्या पाण्यात आईस क्यूब घाला. मग बर्फाला पूर्णपणे वितळू द्या. नंतर थोडया थोड्या वेळाने तुमचा चेहरा त्या पाण्यात बुडवा किंवा हातांवर पाणि घेऊन तुम्ही पाणी शिंपडलं तरी चालेल. जर तुम्हाला बर्फाशी संबंधीत काही त्रास असेल तर हा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.