(Image Credit : Inat.com)
केसांची सुंदरता कायम ठेवण्यासाठी आणि त्यांची मजबूती कायम ठेवण्यासाठी अनेकजण नको नको ते करतात. महागडे शॅम्पू, तेल आणि कंडिशनर्स सुद्धा ट्राय करतात. इतकेच नाही तर हेअर स्पा आणि मसाज थेरपी सुद्धा करतात. पण तेलाने मालिश करणे हा उपाय अनेक वर्षांपासून केला जातो. त्यात जर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर फायदा अधिक होतो.
मोहरीचं तेल केसांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने केसगळती थांबते सोबतच केसांची वाढ होण्यासही मदत होते. पण अनेकांना केसांना मोहरीचं तेल लावण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. आम्ही ही पद्धत सांगणार आहोत.
१) अनेकजण सांगतात की, मोहरीच्या तेलाने रोज केसांची मालिश करावी. पण असं नाहीये. आठवड्यातून दोन दिवसही मोहरीच्या तेलाने मालिश केली तरी फायदा होतो. मोहरीचं तेल लावण्याआधी त्यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या टाकून तेल गरम करावे.
२) तेल थंड झालं की, त्यात लिंबू मिश्रित करा आणि केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. लांब केसांना बोटांच्या मदतीने हळूहळू तेल लावा. यावेळी नखे वाढलेले नसावेत नाही तर डोक्याच्या त्वचेला इजा होण्याची इजा होण्याची शक्यता असते.
३) मोहरीचं केल अनेक वर्षांपासून मसाज करण्यासाठी वापरलं जातं. आयुर्वेदानुसार, मोहरीच्या तेलाचा वापर केसगळती थांबवण्यासाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये हीना मेहंदीची पाने शिजवून हे मिश्रण लावल्याने केस मजबूत होतात.
४) केसांना तेल लावल्यावर कमीत कमी ३ ते ४ तास तसेच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस चांगले धुवा. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा ही प्रक्रिया रिपिट करा. काही दिवसातच याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल.
५) मोहरीच्या तेलाने केसातील कोंडाही दूर होतो आणि केसगळती थांबते. यात बीटा कॅरोटीन, फॅटी अॅसिड, आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम आढळतात. याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
६) मोहरीच्या तेलामध्ये अॅंटी-मायक्रोबियल गुण आढळतात. याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळत आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच केस लांब होण्यासही याने मदत होते.