संपूर्ण आठवडा आपण खूप बीझी असतो. झोप पूर्ण न होण्यापासून जेवणाच्या वेळा चुकण्यापर्यंत कशाचाही ताळमेळ नसतो. याचे परिणाम तुमच्या शरीरासह त्वचेवर सुद्धा होत असतो. नेहमीच सगळ्यांना पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही आणि जरी वेळ मिळाला तरी सतत त्वचेवर आणि केसांवर खर्च करायचा म्हणजे नाकीनऊ येतात.
(image credit-fashion lady)
कारण तुम्हाला माहितच असेल आपण इतका खर्च करून पार्लरच्या ट्रिटमेंट करतो. पण परत काही दिवसांनी 'जैसे थे' अशी अवस्था त्वचेची होत असते. पैसे कमवणं तुलनेने सोपं झाल्यामुळे आपण पार्लरमध्ये स्वतःवर खर्च करण्यासाठी जराही विचार करत नाही. तुम्हाला पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास टिप सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःचा चेहरा चांगला ठेवू शकता. सगळ्यांच्यांच स्वयंपाकघरात मुगडाळ असते. याचा वापर करून तुम्ही कोणताही अतिरिक्त खर्च करता सहज चेहरा चांगला बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्वचेवर मुगाच्या डाळीचा कसा करायचा वापर
मुगाच्या डाळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. त्यासाठी मुगाची डाळ, गुलाबपाणी, मध आणि बदामाचं तेल घ्या. हा पॅक तयार करण्यासाठी रात्री गुलाब पाण्यात मुगाची डाळ भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून या डाळीची पेस्ट तयार करून त्याच मध घाला आणि हे मिश्रण एकत्र करून चेहरा आणि मानेला लावा त्यानंतर २० मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. ( हे पण वाचा-अंडरआर्म्सचा काळपटपणा नकोय? तर 'या' ३ उपायांपैकी कोणताही १ उपाय वापरा)
(image credit-karnival.com)
हा उपाय केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतील शिवाय केमिकल्सचा वापर नसल्यामुळे कोणतेही साईड् इफेक्ट्स सुद्धा होणार नाहीत. त्वचेला ग्लो येण्यापासून मॉईश्चराईज होईपर्यंत फरक दिसून येतो. स्कीनच्या डॅमेज सेल्सना काढून टाकण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि ताजीतवानी वाटते. ( हे पण वाचा-दिशा पटानीच्या सौंदर्याचे रहस्य उलगडणारे 'हे' घरगुती फंडे तुम्हाला माहितही नसतील...)