(image credit-allaboutvision.com)
आजकाल वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे तसेच टेलिव्हीजनसमोर बसून भरपुर वेळ घालवल्यामुळे अनेकांना चष्मा लागतो. तसंच काही जणांना आवड म्हणून चष्मा वापरायला आवडतं असतो. पण काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या भागांवर चष्म्याच्या आकारानुसार डाग पडत असतात. तुम्हाला सुध्दा हीच समस्या असेल तर काही घरगुती घटकांचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर असलेले डाग कोणताही खर्च न करता काढू शकता. तसेच अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रिम्स वापरून सुध्दा चेहऱ्यावरचे चष्म्यामुळे आलेले डाग तसेच राहतात.
(Image credit- vickyhow)
मध
चष्म्याच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध त्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.
बटाटा
बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले अनेक गुणधर्म असतात. यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असं आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल.
अॅलोवेरा
अॅलोवेराचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अॅलोवेरा जेल हातावर घेऊन डोळ्यांच्या आजूबाजूला लावून गोलाकार फिरवा. त्यामुळे चष्म्याच्या वापरामुळे आलेले डाग निघून जाण्यास मदत होईल.
गुलाबपाणी
गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
टोमॅटो
टोमॅटो, व्हिनेगर या पदार्थांच्या सहाय्याने डाग कमी करता येतात. हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. हे पदार्थ दररोज डागांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका.