स्किन अस्थमा हा एक इंफ्लामेट्री त्वचा विकार आहे. ज्यात शरीरात पुरळ येते, त्वचेवर खाज, रॅशेज येतात आणि पॅच तयार होता. या विकाराचं मुख्य लक्षण त्वचेवर खाज येणे हे आहे. या विकाराला एक्जिमा या नावानेही ओळखलं जातं. स्किन अस्थमावर स्पेशल असा उपचार नसल्याचं सांगितलं जातं, पण काही उपायांनी ही समस्या कमी केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ या उपायांबाबत...
मॉइश्चराइज
(Image Credit : www.cheatsheet.com)
स्किन अस्थमाच्या उपचारात नियमितपणे त्वचा मॉइश्चराइज करणं फार गरजेचं असतं. संक्रमण झालेल्या व्यक्तीने नॅच्युरल आणि ऑर्गेनिक मॉइश्चरायजरचा वापर करावा. कारण यात खाज आणणारे केमिकल्स किंवा सेंटेड केमिकल्स नसतात.
मृत पेशींची डागडुजी
ऑलिव्ह ऑइल, कोकोआ बटर, व्हर्जिन कोकोनट ऑइलसारख्या मॉइश्चरायजिंगने युक्त साबण, बाथ जेल आणि क्रीम लावा. कोरड्या त्वचेवर लॉरिक जेल आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल अधिक फायदेशीर ठरतं. याने मृत पेशींना पुन्हा जिवंत केलं जातं.
एक्वस क्रीम
प्रभावित भागाला मॉइश्चराइज करण्यात एक्वस क्रीम मदत करते. त्वचेवर ही क्रीम लावावी. कोरड्या त्वचेवर असं क्रीम लावा ज्याने त्वचा मुलायम होईल.
खाज रोखणारे लोशन
(Image Credit : boldsky.com)
खाज येत असलेल्या त्वचेसाठी काही लोशन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकता. स्वत:च्या मनाने किंवा कुणाच्या सांगण्यावरून कोणतही लोशन वापरू नका.
चांगला आहार
त्वचेची अॅलर्जी आणि सूज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. हिरव्या भाज्या, फळं, कडधान्ये आणि आवश्यक फॅटी अॅसिडचा डाएटमध्ये समावेश करावा. अॅंटी-ऑक्सिडेंट असलेल्या फळांचा अधिकाधिक समावेश करावा.