गोड पदार्थ म्हणून ओळखली जाणारी साखरही स्कीनसाठी फायदेशीर ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून सुटका करून घेण्यासाठी साखरेच्या स्क्रबचा वापर करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात चेहऱ्याच्या त्वचेसाठी होणाऱ्या साखरेच्या स्क्रबबाबत...
शुगर स्क्रब -
पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर साखरेच्या सहाय्याने स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यामुळे तुमची स्कीन स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच चेहरा उजळण्यासही मदत होईल.
शुगर स्क्रब आणि ग्रीन टी -
ग्रीन टी पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. त्यामध्ये साखर मिक्स करा. त्यानंतर हे शुगर स्क्रब चेहऱ्यावर लावा. याचा वापर केल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्यांपासून सुटका मिळेल. या स्क्रबमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. जे स्कीनसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये एन्जाइम आणि अमीना अॅसिड असतं जे स्कीन हेल्दी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
शुगर आणि क्लिंजर -
थोडी साखर आणि क्लिंजर एकत्र करून त्याने चेहऱ्यावर स्क्रब करा. त्यानंतर चेहरा टिशूच्या सहाय्याने किंवा कापडाच्या सहाय्याने स्वच्छ करा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.
बदामाचे तेल आणि शुगर स्क्रब -
1 चमचा साखर आणि 2 चमचे बदामाचे तेल एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब करा. थोडा वेळ ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
दही आणि शुगर स्क्रब -
अर्धा कप दही आणि 2 चमचे साखर एकत्र करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर स्क्रब करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते.