अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप उत्पादनांचा वापर करतात. अलिकडे विविध कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्टस वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स अभिनेत्री अलाया स्वतः रोजच्या जीवनात वापरते आणि त्यामुळेच नो मेकअप लुकमध्ये सुद्धा ती तितकीच सुंदर दिसते. या टिप्स वापरून तुम्ही मेकअप न करता सुद्धा सुंदर दिसू शकता. कारण नेहमीच अभिनेत्रींच्या सुंदर लुकचं आपल्याला आकर्षण असतं आणि त्याप्रमाणे दिसायचं असतं.
खूप क्यूट, सिंपल आणि प्रभावी ड्रेसिंगमुळे अलाया सध्याच्या काळात चर्चेत आहे. अशात तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आलाया इतकी छान आणि सिंपल दिसते कशी? तर मग जाणून घ्या तिच्या क्युटनेसचे गुपीत. अलाया फर्नीचरवाला ही अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी आहे तसंच कबीर बेदी यांची नात आहे. जवानी जानेमन हा अलायाचा पहिला सिनेमा होता.
मेकअपची पहिली स्टेप
सगळ्यात आधी अलाया क्लिंजर आपल्या त्वचेला क्लीन आणि टोन करण्यासाठी वापरते. क्लिंजर स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि लेअर तयार करण्यासाठी तसंच त्वचेला पोषण मिळण्यासाठी फायदेशीर असतात.
मेकअप बेससाठी
चेहरा आणि त्वचेला फिनिशिंग लूक देण्यासाठी अलाया फाउंडेशन प्रिमियमचा वापर करते. त्यानंतर हाइड्रा फाउंडेशनने मेकअप बेस तयार करते. अलाया फिनिशिंग टच नंतर आपल्या त्वचेवर फाऊंडेशन नंतर अल्ट्रा मॅट पावडर आणि कॉम्पॅक्ट लावते. ब्लश करण्यासाठी तुम्ही अलायासारखा सेम लुक करण्याची काही गरज नाही. कारण स्किन टोननुसार तुम्ही आपल्या ब्युटिशियनचे मत विचारात घेऊन मग ब्लश करू शकता.
आईब्रो पेंसिल
आपले आईब्रोज् हेवी आणि डार्क दिसण्यासाठी अलाया वाईल्ड तसंच ब्लॅक पेन्सिलचा वापर करते. यामुळे तुमचे आईब्रो छान आणि डार्क दिसायला मदत होईल. सिंगल लाईट कोड लायनरचा वापर करते. आयलॅशेच एनहान्स करण्यासाठी लायनरचा वापर केल्याने तुमच्यासुद्धा पापण्या दाट दिसतील. ( हे पण वाचा-साबणाची वडी की लिक्विड सोप? त्वचेसाठी काय असतं अधिक फायदेशीर)
लिपस्टिकचा रंग
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या ओठांना कसं ठेवतो हे खूप महत्वाचं असतं. त्यासाठी अलाया न्युड कलर लिपस्टिकचा वापर करते. त्यामुळे तिचा हा लूक नॅचरल दिसून येतो. ( हे पण वाचा-त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर)