शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

स्काल्पवर पिंपल्स येतात? असू शकतो स्काल्प एक्ने, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:46 PM

केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना  कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात.

केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात. कधी कोंडा होणे, कधी केस गळणे तर कधी  केसांमध्ये पुटकुळया उद्भवण्याचा धोका असतो. यातील सगळ्यात त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे केसांच्या मुळामध्ये म्हणजेच स्काल्पवर एक्नेची  समस्या उद्भवते.

साधारणपणे डोक्यात खाज कोंड्यामुळे येते. लहान लहान दाण्यांसारख्या पुळ्या केसांवर येत असतात.  अनेकदा याचे रुपांतर गंभीर आजारांमध्ये सुद्धा होऊ शकते. केसांच्या मुळांना सूज येण्याची समस्या प्रदुषण आणि  फंगल इन्फेक्शनमुळे उद्भवत असते.  त्याला स्काल्प डर्माटाइटिस असं  म्हणतात. याला पर्यायी शब्द म्हणून स्काल्प एक्ने असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊया स्काल्प एक्नेचे कारणं आणि उपाय.

स्काल्प एक्ने झाल्यानंतर डोक्यात पिंपल्स येतात.  ज्यात केसांच्या मागच्या भागाचा सुद्धा समावेश असतो. या पिंपल्समुले खाज यायला सुरूवात होते.  हेयर फॉलिकल डेड स्किन सेल्सना  चिकटून हे फॉलिकल्स असतात. 

 

स्काल्प एक्नेची  कारणं 

हेअरजेल हेअर क्रिम आणि हेअरस्पा यांच्या वापरामुळे एलर्जी होणे.

केसांना चांगले न धुणे.

व्यायाम केल्यानंतर खूपवेळ घाम तसाच ठेवणे. 

केसं सतत झाकून ठेवल्यामुले ओसलरपणा येणे.

जीवनशैलीत झालेला बदल.

स्काल्प एक्ने पासून बचाव करण्यासाठी उपाय

केसांवर खपली यणे, कोंडा होणे तसंच  पिंपल्स येणे या समस्यांपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची  काळजी घेणं गरजेचं आहे.  

केस ताणले जातील अशी हेअरस्टाईल करू नका. 

केसांना मोकळे आणि लूज वाटेल अश्या पध्दतीने बांधा.

व्यायाम केल्यानंतर लगेच केस धुणं टाळा.

केमिकल्सयुक्त ब्युटी प्रोडक्टसचा वापर करू नका. 

केसांची त्वचा चांगली ठेवण्यासाठी  व्हिटामीन ई आणि व्हिाटामीन ए  असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

संतुलित आहार घ्या त्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहील.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स