सिस्टिक एक्ने संपूर्ण चेहऱ्यावर पसरतात. अनेकदा या पुळ्यामध्य पस जमा होतो, रक्त बाहेर येतं. त्यामुळे वेदनाही होतात. अशा प्रकारच्या एक्नेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्सचा वापर करतात. तरिही तोंडावरचे एक्ने पूर्णपणे जात नाहीत. तेलकट त्वचेवर ही समस्या सगळ्यात जास्त उद्भवते. यामुळे संपूर्ण चेहऱ्याचा लूक बिघडतो. चेहऱ्याचे सौंदर्यं अशा प्रकारच्या पुळ्या आल्यानं कमी होतं. ही समस्या जास्त वाढू न देता सुरूवातीला तुम्ही काही घरगुती उपाय वापरून या एक्नेपासून सुटका मिळवू शकता.
सिस्टिक एक्ने म्हणजे काय
चेहऱ्यावर बॅक्टेरिअल इंन्फेक्शन झाल्यानं एक्ने येतात. सिस्टीक एक्ने दोन कारणामुळे चेतात. त्वचेवरचे पोर्स धूळ, माती आणि प्रदुषणामुळे बंद झाल्यानं ही समस्या उद्भवते. क्लॉगिंगमुळे त्वचेवर जास्त प्रमाणात तेल निर्माण होतं. परिणामी जास्त पुळ्या येतात. हार्मोनल बदल, जास्त घाम येणं, जास्त गोड खाणं, तेलकट पदार्थ यांमुळे त्वचेवर एक्नेची समस्या उद्भवते.
उपाय
बर्फ
सिस्टीक एक्नेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची काही गरज नाही घरगुती वापरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही या एक्नेपासून सुटका मिळवू शकता. बर्फाचा वापर तुम्ही करू शकता. बर्फाचे लहान तुकडे करून घ्या हे तुकडे कापडात गुंडाळून त्वचेवर फिरवा ३ ते ४ वेळा बर्फ फिरवल्यानंतर चेहरा धुवून टाका. दिवसातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
हळद
हळदीत अनेक एँटीइन्फामेटरी गुण आणि एँटीऑक्सिडेट्सं असतात. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. एक्ने कमी करण्यासाठी १ चमचा हळद गुलाब पाणी किंवा चंदन आणि पाण्यात मिक्स करा. त्यानंतर त्वचेला लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.
कडुलिंब
कडुलिंबात अनेक एंटी व्हायरल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही कडुलिंब गुणकारी ठरतं. तुम्ही कडुलिंबाचे तेलही वापरू शकता. कडुलिंबाचे तेल त्वचेवर एक्ने असलेल्या ठिकाणी २० मिनिटांपर्यंत लावून ठेवा . त्यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
हे पण वाचा-
शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी
डोक्याला टक्कल पडण्याच्या समस्येनं हैराण आहात? 'या' घरगुती उपयांनी मिळवा लांब केस