श्रावण म्हटलं की, सण आलेच आणि सण म्हटलं की, स्त्रियांचा श्रृगांर आलाच. कदाचितच असा कोणता सण असेल की ज्या सणाला महिला हातावर मेहंदी काढत नसतील. आधी हातावर मेहंदी काढणं ही परंपरा मानली जायची, पण आता मेहंदी काढणं हा एक फॅशन फंडा झाला आहे. त्यामुळे अनेक महिला आणि तरूणी मेहंदीचं खास डिझाइन काढणं पसंत करतात. यामध्ये मेहंदीचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी स्पार्कल, स्टोन, पर्ल, ग्लिटर यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यातच अनेक महिला अशाही आहेत ज्या पूर्ण हातावर मेहंदी काढण्याऐवजी लाइट पण यूनिक डिझाइन काढणं पसंत करतात.
तुम्हीही अशा काही यूनिक डिझाइन शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला काही यूनिक डिझाइन्स सांगणार आहोत.
ही यूनिक आणि सिम्पल डिझाइन सध्या ट्रेन्डमध्ये आहे.
जर तुम्हाला जास्त मेहंदी लावायची नसेल तर फिंगर्सवर अशाप्रकारे तुम्ही यूनिक डिझाइन काढू शकता.