्पाणी शुद्धीकरणाची कमी खर्चिक पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2016 4:38 PM
पाणी शुद्धीकरण खर्चिक बाबीमुळे क्चचितच देशात केले जाते.
दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात. त्याकरिता वैद्यकीय तज्ज्ञांकडून शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पाणी शुद्धीकरण खर्चिक बाबीमुळे क्चचितच देशात केले जाते. पाण्याच्या या शुद्धीकरणासाठी शास्त्रज्ञांनी सोपी पद्धत शोधून काढली आहे. वॉशिंगटन विद्यापीठातील संशोधक यावर संशोधन करीत आहेत. ग्राफिन आॅक्साइड व सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. या पद्धतीमध्ये दूषित पाणी हे शुद्ध करण्यात येऊन, त्याचा विकसनशील आणि अविकसित देशांना फायदा होणार असल्याचे संशोधकांच्या गटातील प्रा. श्रीकांत सिंघमनेनी यांनी सांगितले. पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असणाºया देशासाठी ही पद्धती खूप फायदेशीर आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार बाष्पीभवन केल्यास पाण्ी शुद्ध होते. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे वेगवेगळे आजर जडून अनेकांचे बळी सुद्धा जातात. भारतात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असल्याने त्याचा चांगला फायदा होणार आहे. ही शुद्धीकरणाची पद्धतही खूप सोपी आहे. त्याकरिता ग्राफेन आॅक्साईडचा उपयोग करण्यात आलेला आहे. ग्राफेन आॅक्साईडच्या भागाचा बॅक्टेरियानिर्मिती करणाºया सेल्युलोजसोबत वापर करुन, बायोफोम तयार केला आहे. या बायोफोमनेच दूषित पाण्याचे हे शुद्धीकरण होते. निरोगी आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे गरजेचे आहे. याकरिताच शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.