हिवाळा सुरू झाल्यानंतर ओठ फाटण्याची समस्या उद्भवते. चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसण्यात ओठांचीही महत्वाची भूमिका असते. हिवाळ्यात ओठ वारंवार फाटून काळपटपणा येतो. त्यामूळे चेहऱ्याचा लूक बिघडू शकतो. सगळ्यांनाच आपले ओठ सुंदर आणि चांगले हवे असतात. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अनेकदा आपण महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. पण त्यामुळे सुद्धा हवातसा उपयोग होत नसतो.
ओठ सुंदर आणि चांगले नसतील चेहरा आणि त्वचेचा लूक खराब होत असतो. ओठांना पोषण मिळालं नाही तर ओठ सुकतात आणि त्वचा निघण्यास सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते तेलाचे प्रकार आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही सुंदर सॉफ्ट ओठ मिळवू शकता.
नारळाचं तेल-
नारळांच तेल केसांसाठी खूप फायदेशीर ठरत असतं हे तुम्हाला माहीत असेल. पण ओठांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. घरात सहज वापरात असलेलं नारळाचं तेल ओठ चांगले राहण्यासाठी ओठांना लावून रात्रभर ओठ तसेच राहू द्या. त्यामुळे ओठ मऊ होतील.
तुपाचा वापर करा
नाभीमध्ये तुप लावणे त्वचेसाठी फायदेशीर असतं. अनेक वर्षापासून लोक नाभीमध्ये तुप लावत आहेत. कारण त्यामुळे त्वचा चांगली राहते. त्यासोबतच ओठ मऊ आणि मुलायम होतात.
राईचं तेल
राईचं तेल ओठांना व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यासाठी रात्री झोपताना राईचं तेल ओठांना लावून झोपाल तर फरक दिसून येईल.
कडुलिंबाचं तेल
कडुलिंबाच्या तेलात अनेक एंटी बॅक्टेरीअल गुण असतात. तसंच त्यात एंटी ऑक्सीडंट्स सुद्धा असतात. त्यासाठी झोपण्याआधी कडूलिंबाच्या तेलाचा वापर करा.
लिंबाचं तेल
लिंबाच्या तेलात विटामीन सी असंत. हे तेल नाभीमध्ये लावल्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो. त्वचा निस्तेज निर्जीव दिसत नाही.
जगातील सगळ्यात सुंदर राणी माहित्येय का? सुंदर दिसण्यासाठी करायची 'असा' भन्नाट जुगाड
ऑलिव ऑईल
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी आणि ओठांसाठी लाभदायक ठरत असतं. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन ई असतं. त्यामुळे ओठांवर ते तेल लावल्यास चमक टिकून राहते.
लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी
बादामाचं तेल
बदामाच्या तेलात व्हिटामीन ई असतं. त्यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या चमक देण्यासाठी बदामाचं तेल फायदेशीर ठरत असतं. त्यासाठी तेल गरम करून ते नाभीला लावा. त्यामुळे काळे आणि फाटलेले ओठ मुलायम होण्यास मदत होईल.