कमी उंचीच्या मुलांची संख्या भारतात मोठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2016 4:28 PM
लहान मुले हे उद्याचे सुजान नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आपले व्यक्तिमत्व उठवून दिसण्यासाठी वयोनुसार उंचीही महत्त्वाची आहे. मात्र, ज्या वयामध्ये जी उंची आवश्यक आहेत, ती नसणाºया मुलांची संख्या ही भारतात मोठी आहे. ही आपल्या देशासाठी गंभीर बाब असून, नुकत्याच एका अहवालातून हे समोर आले आहे. भारतामध्ये अशी मुले ही थोडी नसून, तब्बल ४ कोटी ८० लाख आहे. त्यांना मिळणारा आहार हा चांगला नसेल, त्यामुळेच त्यांची वाढ ही खुंटली असल्याचे आपल्याला वाटत असेल. पण यामागचे कारण अस्वच्छता व अशुद्ध पाणी असल्याचे अहवालात म्हटले आहे. उंची कमी म्हणजे ही मुले ठेंगणे नाहीत, वयाच्यानुसार त्यांची उंची ही खूपच कमी आहे. आपल्या देशात स्वच्छतेच्या अनेक मोहिम राबविण्यात येत आहेत. तरीही उघड्यावर शौचास बसणाºयांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे दुर्गंधी व जंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. जवळपास ५० टक्के बालकांचे कुपोषण हे जंतूंमुळे होणारे पोटाचे विकार, अशुद्ध पाणी व अस्वच्छतेमुळे होते. आजही जगातील ६५ कोटी लोकांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी मिळत नाही.