लो टेस्टोस्टेरॉनमुळे मधुमेहाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2016 6:22 PM
ज्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते त्यांना मधूमेह होण्याची शक्यता अधिक असते.
‘मधूमेह’ सध्या भीषण समस्या बनत आहे. मधुमेहाचा धोका कसा टाळता येईल यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. त्यात आता यश मिळू शकते अशी आशा निर्माण झाली आहे.एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, ज्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते त्यांना मधूमेह होण्याची शक्यता अधिक असते. पुरुषांमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पॅनक्रिज भागातील पेशीसमुहाला उत्तेजित करण्याचे काम टेस्टोस्टेरॉन करत असते.त्यामुळे वय आणि प्रोस्टेट कॅन्सर थेरपीमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असलेल्या पुरुषांमध्ये टाईप २ मधुमेहाचा इलाज करणे शक्य होणार आहे.अमेरिकेतील टुलाने युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिनमधील प्रमुख संशोधक फ्रँक मौवेज्-जार्विस यांनी माहिती दिली की, मधूमेह होण्यामागचे कारण शोधण्यात आम्हाला यश आले आहे. टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये अँटी-डायबेटिक म्हणून काम करते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असलेल्या पुरुषांमध्ये टाईप २ मधुमेहावर उपचार पद्धती शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.‘सेल मेटाबोलिज्म’ या जर्नलमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. नर उंदरावर प्रयोग करून संशोधकांनी वरील निष्कर्ष काढला असून मधूमेह उपचार पद्धतीत यामुळे क्रांती घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे.