शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

​स्वत:ला बनवा ‘परफेक्ट’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 9:47 AM

आज प्रत्येकाला वाटते की, आपले जीवन सुखी, आनंदी, उत्साही, शांततामय, निरोगी असायला हवे.

-रवींद्र मोरे आज प्रत्येकाला वाटते की, आपले जीवन सुखी, आनंदी, उत्साही, शांततामय, निरोगी असायला हवे. मात्र बऱ्याचदा अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येते की, त्यामुळे आपले निर्णय बदलतात आणि आपले आयुष्य वेगळ्याच ठप्प्यावर वळण घेतं. त्यावेळी एकतर स्वत:ला बदलायला वेळ नसतो आणि परिस्थितीतर मुळीच बदलू शकत नाही. मग अशावेळी पश्चात्तापाशिवाय आपल्याजवळ काहीच नसते. कदाचित आपली निर्णय क्षमता जर बळकट राहिली असती तर ही वेळ आली नसती. मग ही निर्णय क्षमता सर्वांचीच बळकट असायला हवी. त्यासाठी मात्र आपल्याला ‘परफेक्ट’ होणे म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी स्वत:ला परफेक्ट बनविण्यासाठी खूपच मेहनत घेतात. उदाहरण द्यायचे म्हणजे बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान. आमिरने स्वत:ला परफेक्ट बनविण्यासाठी अजोड मेहनत केली असल्यामूळेच हे शक्य झाले आहे. आजच्या फीचरमधून आपण स्वत:ला ‘परफेक्ट’ कसे बनवायचे हे जाणून घेऊया...असे बनवा स्वत:ला परफेक्ट...* परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवा. विशेष म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत नाही त्या मुळात करुच नका. आणि जे काम तुम्ही यापुढे करु शकत नसाल, तर ते काम करणे थांबवा. मग त्यासाठी तुम्हाला वेळ लागला तरी चालेल. * एकावेळी एकच काम करा. असे करण्यात तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम मिळेल आणि आपल्या मनाला आनंद देखील मिळेल. * प्रत्येक रविवारी कमीत कमी १० ते १५ मिनीट वेळ काढुन संपूर्ण आठवड्याचे नियोजन करा. यात अति महत्त्वाच्या कामांना प्राधान्यक्रम द्या. यामुळे आपण आठवडाभराच्या कामांना सहज आणि सोप्या पद्धतीने निश्चिंत करु शकता. * घरात ज्या खाद्यपदार्थांची गरज असते, त्यांची खरेदी आठवड्याच्या सुरुवातीला एकाचवेळी करा. यामुळे आपला वेळ, ऊर्जा आणि पैशांचा अपव्यय होणार नाही.  * एका वर्षापासून ज्या वस्तूंचा आपण उपयोग केला नसेल त्या वस्तूंना एकतर आपल्या मित्रांना द्या नाहीतर फेकून द्या. ज्या वस्तू सध्यस्थितीत वापरत आहात त्यांचा सदुपयोग करा.  * रोज स्वत:ला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारा की, ‘आता कोणती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी मी करू शकतो? तसेच परिस्थिती साधी आणि सोपी बनविण्यासाठी कोणते पाऊल मला उचलायचे आहेत? * रोज एक तरी असे दयाळूपणाचे काम करा. निंदा तर मुळीच कुणाची करू नका.  * आपल्या विचारात नकारात्मता असेल तर ती बदलवा आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करा. यामुळे आपल्यात एक नवीन ऊर्जा तयार होऊन आपली कामे सहज आणि सोपे होतात. * कोणतेही काम करण्याआधी स्वत:च्या मनात एक प्रबळ ईच्छाशक्ती जागृत करा, यामुळे अपेक्षित ध्येय गाठता येईल. * नेहमी आपल्या स्मरणात महत्त्वाच्या गोष्टी राहतील याची काळजी घ्या. ही सवय लावल्यास आपली मेमरी स्ट्रॉँग होईल. * आपल्यात संवादकला असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. लोकांशी बोलताना नेहमी विचार करुनच बोलावे. * आपण सर्वज्ञानी आहोत हा अहमंपणा नसावा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शिकले पाहिजे.* आयुष्यात हास्यविनोदाला महत्त्वाचे स्थान द्या. रोज काही प्रमाणात का होईना खळाळून हसले पाहिजे. * दिवसभर आपण जे काही योग्य - अयोग्य कामे केले असतील, या घटनांची उजळणी रात्री झोपायच्या आधी करा. आणि त्यावर मननदेखील करा. यामुळे आपल्यातील अवगूण आपोआपच कमी होतील आणि आपण परफेक्ट बनू.