परफेक्ट मेकअप करणं हिदेखील एक कला आहे. आपण अनेकदा ऐकतो की, 'प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट' हे वाक्य मेकअपबाबतही तंतोतंत लागू होतं. प्रॅक्टिस केल्याने व्यवस्थित मेकअप करणं शिकणं शक्य होतं. अनेक तरूणी मेकअप करताना वेगवेगळ्या एक्सपरिमेंट्स करताना दिसतात. पण जास्तीत जास्त तरूणींची अशी तक्रार असते की, त्यांचा मेकअप जास्त वेळ टिकत नाही. अशातच उन्हाळ्यामध्ये अनेकांना याच समस्येचा सामना करवा लागतो.
मेकअप केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच चेहऱ्या निस्तेज दिसू लागतो. मेकअप हळूहळू त्वचेवरून निघून जातो. अनेकदा चेहऱ्यावर मेकअपचे पॅचेसही दिसू लागतात, त्यामुळे अनेकदा सौंदर्य बिघडतं. अशातच मेकअप काढून टाकणं हाच एकमेव पर्याय असतो. परंतु तुमचा मेकअप बराच वेळ राहावा असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
अनेक मेकअप एक्सपर्ट्सनुसार, खरं तर मेकअप त्वचेवर किती वेळा राहिला पाहिजे, हे आपल्या त्वचेवर अवलंबून असतं. जर तुमची त्वचा अधिक ऑयली असेल तर त्वचेवरून मेकअप वितळून जातो. ड्राय स्किन असेल तर मेकअपची पकड निघून जाते. पण हेच जर त्वचेला बॅलेन्स केलं तर मेकअप लवकर निघून जात नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत, ज्यांचा मेकअप करताना सामवेश केल्याने मेकअप लगेच निघून जात नाही.
1. मॉयश्चरायझर
तुमची स्किन ऑयली असो किंवा ड्राय, मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर मॉयश्चरायझर लावणं गरजेचं असतं. चेहरा चांगल्या फेसवॉशने धुतल्यानंतर मॉयश्चरायझर लावा. 2 ते 3 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यांनतर पुढिल मेकअप करा. हे मॉयश्चरायझर त्वचा हायड्रेट करून तिला मेकअपसाठी अनुकूल करण्याचं काम करतो. कारण संपूर्ण दिवसभरामध्ये अनेकदा आपली स्किन डिहायड्रेट होत असते. अशातच मॉयश्चरायझर हायड्रेट करण्याचं काम करतं.
2. प्रायमर
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर प्रायमर लावल्याने चेहऱ्याला स्मूथ टच मिळतो. प्रायमर आपल्या चेहऱ्यावरील पोर्स कव्हर करतं. त्यामुळे पोर्स कव्हर होतात आणि मेकअप व्यवस्थित चेहऱ्यावर अप्लाय करता येतो. बाजारात विविध प्रायमर्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करून पोर्सवर अप्लाय करू शकता.
3. पावडर
मेकअपवर मॉयश्चरायझर, प्रायमर, फाउंडेशन, कंन्सीलर यांसारखे मेकअप बेस लावल्यानंतर हे सर्व सेट करण्यासाठी पावडरचा उपयोग करा. पावडर चेहऱ्यावरील मेकअप बेस लपवण्याचं काम करतो. यामुळे कंन्सीलरही कव्हर होतं. मेकअप प्लेन दिसावा असं वाटत असेल तर त्यावर पावडर लावा. पावडरमध्ये तुम्ही लूज पावडर किंवा प्रेस्ड पावडरचा वापर करू शकता.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.