(Image Credit : Wikinow)
उन्हाळ्यामध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये घरातून बाहेर पडणं अगदी नकोसं होतं. तसेच उन्हामध्ये सतत बाहेर राहिल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेलाही नुकसान पोहोचतं. पण यामध्ये सर्वांना सतावणारी एक कॉमन समस्या म्हणजे, टॅनिंग. अनेकदा उन्हामुळे त्वचा काळंवडते किंवा टॅन होते. यावर उपाय करून कंटाळा येतो पण टॅनिंग काही दूर होत नाही. अशावेळी मलई उत्तम उपाय ठरते. आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत आहे की, मलईचा प्रोबायोटिक्समध्ये समावेश होतो. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यामुळे फक्त त्वचेवर नॅचरल ग्लो येत नाही तर आरोग्यासाठीही हे अत्यंत उपयोगी ठरतं. याव्यतिरिक्त मलईच्या सेवनाने शरीराला गुड फॅट्स मिळण्यासाठीही मदत होते. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याची त्वचा ड्राय वाटत असेल तर यावर उपाय म्हणून मलईचा वापर करणं गुणकारी ठरतं.
...म्हणून फायदेशीर आहे मलई
उन्हाळ्यामध्ये सतावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे, शुष्क त्वचा आणि टॅनिंग. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडल्यामुळे अनेकदा त्वचेवर टॅनिंगची समस्या उद्भवते. यावर उपाय म्हणून मलईचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. मलईमध्ये असणारे फॅट्स त्वचेला मॉयश्चर करण्यासाठी मदत करतात. हे मॉयश्चर त्वचेवर फॅट्सचं एक कोटिंग करतात. ज्यामुळे बाहेरील धूळ, ऊन त्वचेला नुकसान पोहोचवत नाही.
असा करा वापर
त्वचेवरील टॅनिंग (tanning) दूर करण्यासाठी मलई आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर 10 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि त्यानंतर सर्कुलर मोशन (circular motion) मध्ये मसाज करत त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
असा वाढवा त्वचेचा उजाळा
मलई (milk cream) पासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे फेस पॅक त्वचा सुंदर करण्यासाठी त्वचा उजळवण्यासाठीही मदत करतात. मलईमध्ये बेसन एकत्र करून त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. यामुळे त्वचेवर उजाळा येतो. याव्यतिरिक्त मलईमध्ये हळद एकत्र करून लावल्याने त्वचा उजळते.
सुरकुत्या दूर होतात
मलईचा वापर फक्त त्वचेला पोषण देण्यासाठी नाहीतर त्वचा मुलायम करण्यासाठीही मदत करतं. तसेच यामुळे ओपन पोर्सची समस्याही दूर होते. मलईमध्ये मध एकत्र करून तयार मिश्रण सर्क्युलर मोशनमध्ये त्वचेवर मालिश करा. यामुळे ओपन पोर्सची समस्या दूर होते आणि ब्लॅकहेड्स (black heads) दूर होतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.