उन्हाळ्यात सर्वात जास्त समस्या त्वचेला सहन कराव्या लागतात. पुरळ, स्कीन टॅनिंगची समस्या, रॅशेज, पिंपल्स या समस्या सामान्यपणे होतातच. तसेच काही वेळा त्वचेवरील तेलाचं प्रमाणही वाढतं. पिंपल्स अधिक होऊ लागतात. पण अशात अनेकजण केमिकलयुक्त प्रॉडक्टचा करून समस्या अधिक वाढू शकते. यावर नैसर्गिक पद्धतीने उपाय केले जर आरोग्यही चांगलं राहील आणि त्वचेच्या समस्याही दूर होतील. पाणी हे नेहमीच त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. जर तुम्हाला त्वचेसंबंधी समस्यांपासून बचाव करायचा असेल तर साधं पाणी पिण्याऐवजी त्यात काही गोष्टी मिश्रित करून प्यायल्यास तुम्हाला फायदा होईल.
दालचिनी
पाण्यात दालचिनी पावडर टाकून हे पाणी चांगलं उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून सेवन करा. अशाप्रकारे पाण्यात दालचिनी पावडर टाकून सेवन केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. अर्थातच याने चेहऱ्यावर वेगळी चमक दिसेल.
स्ट्रॉबेरी
(Image Credit : Nutrition By Mia)
तुम्ही कधी पाण्यात स्ट्रॉबेरी टाकून पाणी प्यायले नसाल. पण हे करून बघा. पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस टाकून सेवन करा. याने त्वचेवरील डाग दूर होतील. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सिडेंट्स गुण असतात. तसेच स्ट्रॉबेरीचा मास्क लावल्याने त्वचेची टॅनिंगही दूर होते.
मध
(Image Credit : Healthcare India)
मधाचा वापर वर्षानुवर्षे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातोय. कारण यात बॅक्टेरियाशी लढण्याचे गुण असतात. पाण्यात मध टाकून प्यायल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते. यासाठी कोमट पाण्यात एक चमचा मध मिश्रित करा आणि प्या. याने शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यासही मदत होते.
चिया सीड्स आणि मिंट
(Image Credit : Cook for Your Life)
चिया सीड्समध्ये अॅंटीऑक्सिडेंट आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असतात. याने त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. उन्हाळ्यात निर्जीव झालेल्या त्वचेला तजेलदार करण्यास याने मदत होते. तसेच पाण्यात पुदीन्याचा रस मिश्रित करून प्यायल्यासही त्वचेवर पिंपल्स येत नाहीत.
लिंबू आणि अॅपल व्हिनेगर
लिंबू चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी चांगलं ओळखलं जातं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर होतात. पाण्यात लिंबू किंवा अॅपल व्हिनेगर टाकून प्यायल्यास फायदा होईल. याने शरीर हायड्रेट राहील आणि त्वचेसंबंधी समस्याही होणार नाहीत.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)