महिला असो पुरूष आजकाल डॅन्ड्रफ म्हणजेच केसात कोंडा होण्याची समस्या सामान्य झाली आहे. पावसाळ्यात तर ही समस्या आणखी वाढते. वातावणातील ओलाव्यामुळे त्वचा कोरडी होते, परिणामी केसांमधील डॅन्ड्रफची समस्या वाढते. याव्यतिरिक्त केसांची योग्य स्वच्छता न करणं, केसांना गरजेनुसार तेल न लावणं, जास्त घाम येणं, हार्मोन्सचं असंतुलन आणि अनेकदा तणावामुळेही केसात डॅन्ड्रफ होतो.
जर वेळीच या समस्येवर उपाय केले नाही तर संपूर्ण स्काल्पला म्हणजेच, डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं. जाणून घेऊया पावसाळ्यात डॅन्ड्रफपासून सुटका करण्याचे उपाय :
केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय :
- दोम चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. साकाळी मिक्सरमध्ये यांची पेस्ट करून डोक्याच्या त्वचेला लावा. 30 मिनिटं लावून ठेवा आणि त्यानंतर रीठाच्या पाण्याने धुवून टाका. (रीठा म्हणजे, एक आयुर्वेदfक औषधी वनस्पती. केसांचं आरोग्य चांगल राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.)
- आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना ऑलिव्ह ऑइल लावा. यामुळे स्काल्पची त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होते. तसेच यातील पोषक तत्व कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.
- दोन कप नॉर्मल पाण्यामध्ये दोन कप व्हिनेगरचं पाणी एकत्र करा आणि त्याने केस धुवा.
- एका बाउलमध्ये 3 चमचे बेकिंग सोडा पावडर घ्या, यामध्ये 3 चमच लिंबाचा रस एकत्र करून घ्या, तयार पेस्ट स्काल्पला लावा.
- खोबऱ्याच्या तेलामध्ये टी-ट्री ऑइल एकत्र करा आणि हे स्काल्पवर लावून मालिश करा. अर्धा तास तसचं ठेवून कमी केमिकल असणाऱ्या शॅम्पूने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.