बदलतं वातावरण आणि धावपळीच्या जीवनाचा फक्त आरोग्यावरच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. सध्या अनेक लोकांना केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तज्ज्ञांच्या मते, केसांची काळजी न घेणं, आहार व्यवस्थित न घेणं यांसारख्या कारणांमुळे केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, काही लोकांमध्ये अनुवंशिक कारणांमुळेही केस पांढरे होण्याची समस्या होते.
परंतु, याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात. जाणून घेऊया अशी काही कारणं ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते आणि त्याचसोबत यावर उपाय म्हणून ऑलिव्ह ऑइलचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा याबाबत माहिती करून घेऊया...
1. केसांतील कोंड्यामुळे पांढरे केस
केस पांढरे होण्याच्या अनेक समस्यांपैकी एक समस्या केसांमध्ये कोंडा होणं हिदेखील आहे. हा कोंडा डोक्याची त्वचा आणि केस ड्राय असल्यामुळे त्याचप्रमाणे केसांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे होतं. नियमितपणे डोक्याची त्वचा आणि केसांवर ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. त्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2. सूर्याची किरणं
कडक उन्हामुळेही केसांचा नैसर्गिक रंग खराब होतो. हा रंग अबाधित ठेवण्यासाठी केसांना ऑलिव्ह ऑइल लावणं फायदेशीर ठरतं. या तेलामध्ये व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग परत मिळण्यास मदत होते.
3. पीएच लेव्हलमधील संतुलन बिघडल्याने
ज्याप्रमाणे शरीराच्या त्वचेचं पीएच लेव्हल असतं त्याचप्रमाणे डोक्याच्या त्वचेचंही पीएच लेव्हल असतं. हे पीएच लेव्हल बिघडल्याने केस तुटणं, केस गळणं, केस पांढरे होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ऑलिव्ह ऑइल डोक्याच्या त्वचेला आवश्यक ती पोषक तत्व पुरवतात आणि पीएच लेव्हल मेन्टेन करण्यासाठी मदत करतात.
4. केमिकल्समुळे केस पांढरे होतात
जेव्हा डोक्याची त्वचा आणि केसांवर गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर करण्यात येतो. तेव्हा केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यात येतो. या केमिकल्सचा परिणाम कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलने मसाज करणं हा एक घरच्या घरी आणि कमी पैशांमध्ये करता येण्यासारखा उपाय आहे.
5. हे देखील एक कारण
अनेकदा केस डॅमेज झाल्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या होते. केस डॅमेज होण्याची अनेक कारणं आहेत. परंतु, जर वेळीच केसांची योग्य कळजी घेतली तर या समस्यांपासून सुटका करणं सोपं असतं. तसेच केस पांढरे होण्यापासूनही बचाव होतो. त्यासाठी ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. हेअर पॅकमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून हा पॅक डोक्याची त्वचा आणि केसांवर लावा. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसून येईल.