त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक कॉस्मॅटिक्स आणि घरगुती उपयांचाही वापर केला जातो. पण अनेकदा हवेतील प्रदुषण आणि धकाधकीचं दैनंदिन जीवन यांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्ही तुमची त्वचा निरोगी आणि परफेक्ट बनवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा स्किन टाइप माहीत असणं गरजेचं असतं. जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी उपाय करणं सोपं जातं. आज आपण जाणून घेऊयात ड्राय स्किनच्या कॉमन लक्षणांबाबत आणि अशाप्रकारच्या त्वचेसाठी काय उपाय करणं गरजेचं असतं त्याबाबत...
ड्राय स्कीनची लक्षणं -
1. ड्राय स्कीन
आपली त्वचा शरीरात असणाऱ्या नैसर्गिक ऑईलमुळे उजळलेली आणि तजेलदार दिसते. पण जर तुमची त्वचा ड्राय असेल तर, ती सुकलेली आणि निर्जीव दिसते. याव्यतिरिक्त त्यांच्या केसांच्या मुळांशी असलेली त्वचाही शुष्क असते. त्यामुळे केस गळणे आणि केसात कोंडा होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
2. खाज येणं
जर तुमची स्कीन ड्राय असेल तर तुम्हाला खाजेसारख्या समस्यांना सामोरं जावं लागेल. काही लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. बऱ्याचदा झोपल्यावर याचा त्रास जास्त होतो.
3. लाल पुरळ येणं
जर तुमच्या त्वचेवर कोणतंही कारण नसताना लाल डाग येत असतील तर हे सुद्धा ड्राय स्कीनचं लक्षण आहे.
4. त्वचेवर भेगा
ड्राय स्कीन असण्याचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे तुमच्या त्वचेवर पडलेल्या भेगा. जेव्हा त्वचा गरजेपेक्षा जास्त ड्राय होते तेव्हा त्यावर भेगा दिसण्यास सुरुवात होते. अशा लोकांची केवळ शरीराची त्वचाच नाही तर ओठांवरही भेगा दिसतात.
5. ड्राय ओठ
ओठांचं फाटणं, सुकलेलं दिसणं, रंग काळपट होणं आणि सतत ओठांमधून रक्त येणं हे सुद्धा ड्राय स्कीनची लक्षण आहेत.
ड्राय स्किन ठिक करण्याची 5 उपाय -
1. मॉइश्चरायझ करा
ड्राय स्कीनसाठी असलेला मॉइश्चराझरचाच वापर करा. दर 2 तासांनी स्कीनवर हे मॉइश्चरायझर लावा. स्कीन जेवढी जास्त हायड्रेट राहील तेवढीच जास्त हेल्दी राहील.
2. भरपूर पाणी प्या
जेवढं शक्य आहे तितकं पाणी प्या. जर तुम्ही दिवसांतून एक बॉटल पाणी पित असाल तर त्याच्या दुप्पट पाणी प्या. हळूहळू पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. जेवढं शरीर आतून हायड्रेट राहील तेवढी त्वचा बाहेरून तजेलदार दिसेल.
3. दैनंदिन जीवनात बदल करा
नीट डाएट नसल्यामुळे आणि लाइफस्टाइल व्यवस्थित नसल्यामुळेही त्वचेवर वाईट परिणाम होतो. पाण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या म्हणजेच ज्यूस, व्हिटॅमिन किंवा प्रोटीन ड्रिंक्स यांसारख्या गोष्टींचं सेवन वाढवा. भरपूर व्यायाम करा. जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होईल.
4. मेडिकल ट्रीटमेंट
जर या सर्व प्रकारांनंतरही तुमच्या स्कीनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यांच्या सल्ल्यानेच पूर्ण ट्रीटमेंट करा.
5. घरगुती उपाय
घरच्या घरीच दही, मध, पपई यांसारख्या गोष्टी वापरून वेगवेगळे फेस पॅक तयार करा आणि त्याचा वापर करा. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीनं मुलायम होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त कडक उन्हामध्ये जाणं टाळा.