तुम्हाला त्वचेला काहीही समस्या झाली असेल असेल मुलतानी माती त्वचेसाठी कोणत्याही बॉडीगार्ड पेक्षा कमी नाहीये. पिंपल्सची समस्या असो वा तेलकट त्वचेची, किंवा डार्क सर्कलने हैराण असाल तर अशात या समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती सर्वात जास्त गुणकारी ठरते. उन्हाळ्यात मुलतानी मातीचे फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ कशाप्रकारे मुलतानी माती ऑइली स्कीनपासून तुम्हाला कशी सुटका मिळवून देते.
ऑयली स्कीनसाठी
मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशिअम क्लोराइडचं प्रमाण भरपूर असतं. याने अॅक्ने आणि ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी तुम्हाला फार मदत मिळते. मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात एक चमचा चंदन पावडर, एक चमचा गुलाबजल आणि दूध मिश्रित करा. याची चांगली मुलायम पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
चमकदार त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेसपॅक
मुलतानी माती, ग्लिसरीन आणि बदामची पेस्ट - मुलतानी माती, बदाम आणि ग्लिसरीनची पेस्ट करा. ती डोळ्यांखाली लावा आणि थोडा वेळ ठेवा. तुम्हाला हवं असेल तर ही पेस्ट तुम्ही चेह-यावरही लावू शकता. ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर धुवून टाका.
मुलतानी माती आणि दूध - मुलतानी माती दूधासोबत एकत्र करुन लावल्यास काळे डाग दूर केले जाऊ शकतात. दूधातील काही गुणधर्मांमुळे डोळ्यांना आराम मिळेल.
दही आणि मुलतानी माती - दह्याने काळे डाग दूर केले जाऊ शकतात. अशात मुलतानी माती आणि दह्याची पेस्ट काळे डाग दूर करण्यासाठी चांगला पर्याय आहे. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता.