How To Black My White Hair: कमी वयात केस पांढरे होणं हे पर्सनॅलिटीच्या दृष्टीने फारच वाईट दिसतं. तसेच कमी वयातच केस पांढरे होणं हे तुमचं आरोग्य चांगलं नसल्याचा इशाराही देतं. वेगवेगळ्या कारणांनी आजकाल लोकांचे केस लवकर पांढरे होतात. अशात केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केला जातो. पण त्यांचेही दुष्परिणाम असतात. जर तुम्हाला नॅचरल पद्धतीने केस काळे करायचे असतील काही उपाय करू शकता.
१) कढीपत्ता
कढीपत्त्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि केसांसंबंधी अनेक दूर करण्यासाठी याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर मानला जातो. याचा वापर करण्यासाठी कढीपत्त्याची काही पाने खोबऱ्याच्या तेलात गरम करा. पानं काळी होईलपर्यंत तेल गरम करा. नंतर तेल गाळून घ्या आणि नियमितपणे डोक्याच्या त्वचेची या तेलाने मालिश करा.
२) खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
खोबऱ्याचं तेल आपल्या न्यूट्रिशन आणि मॉइश्चरायजिंग गुणामुळे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. तर लिंबाच्या रसांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर असतात ज्यांमुळे केसांची वाढ होते. तसेच केस पांढरे होणंही रोखलं जातं. खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण डोक्याची त्वचा आणि केसांना लावा. ३० मिनिटांनंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय नियमितपणे करू शकता.
३) आवळा ठरतो फायदेशीर
आवळा पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. यात व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेट्स आणि आवश्यक पोषक तत्व भरपूर असतात. याने केस पांढरे होणं रोखलं जातं. तुम्ही आवळ्याचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आवळ्याच्या ज्यूसचं नियमितपणे सेवन करा.
४) काळा चहा
काळ्या चहामध्ये टॅनिन असतं जे केसांना काळं आणि मजबूत बनवतं. एक कप काळा चहा बनवा आणि थंड होऊ द्या. हे डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लावा. एक तासानंतर केस धुवून घ्या. याने केस हळूहळू काळे होऊ लागतील. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय करू शकता.
५) कांद्याचा रस
कांद्याच्या रसामध्ये कॅटालेज नावाचं तत्व असतं. हे एक एंझाइम आहे जे हायड्रोजन पॅराक्साइड तोडण्यास मदत करतं. हायड्रोजन पॅराक्साइड हे वेळेआधीच केस पांढरे होण्याचं एक सामान्य कारण आहे. यासाठी कांद्याचा रस काढा आणि डोक्याच्या त्वचेवर लावा. हलक्या हाताने मालिश करा. ३० मिनिटांनंतर केस शाम्पूने धुवून घ्या.