थंडीमध्ये सर्व तरूणींना आणि महिलांना सतावणारी समस्या म्हणजे मेकअप. ऑफिस जॉब करणाऱ्या महिलांना दररोज प्रेजेन्टेबल राहणं गरजेचं असतं. बदलत्या ट्रेन्डनुसार मेकअपमध्येही अनेक बदल घडून आले आहेत. महिलांमध्ये जुन्या गोष्टींची ओढ राहत नाही, परंतु दररोज वेगळा लूक करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. आज जाणून घेऊयात अशा काही ट्रिक्स ज्या फार कमी वेळामध्ये हटके लूक देण्यास मदत करतील.
आय मेकअपचा खास अंदाज
सध्या अनेक महिला आयमेकपसोबत वेगवेगळे एक्सपरिमेंट करताना दिसतात. हल्ली डोळ्यांसाठी फक्त गोल्डन किंवा पिकं आयशेड्स नाही तर निऑन कलरच्या आयशेड्सचा वापर करण्यात येतो. निऑन म्हणजे ब्राइट, नॅचरल कलर्स. ज्यामध्ये ग्रीन, यलो, पीच, ब्ल्यू, पर्पल, रूबी रेड आणि लेमन ग्रीन यांसारख्या कलरचा समावेश होतो. निऑन आयशेड्सचा वापर करताना डोळ्यांसाठी लायनर किंवा वॉल्यूमायजिंग मस्कऱ्याचा वापर करा. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील. त्यानंतर आय लायनरचा वापर करा. गरज असल्यास व्हाइट लाइन एरियावर ब्रशने काजळ लावा. त्यानंतर आयब्रो हयलाइट करा.
गालांना हायलाइट करा
गालांना हायलाइट करण्यासाठी कोरल सॉफ्ट, पिंक, ऑरेंज यांसारखे सॉफ्ट शेड्सचा वापर करा. जास्त हेव्ही शेड्सचा वापर करू नका नाहीतर लूक खराब होऊ शकतो. तुमच्या फेस कटनुसार हायलायटरचा वापर करा.
नखांची शोभा वाढविण्यासाठी सध्या नेल आर्ट करण्याचा ट्रेन्ड आहे. तुम्हीही तुमच्या आवडीचा एखादा नेल आर्ट ट्राय करू शकता.
रोलर हेअर स्टाइल
केसांना व्यवस्थित विंचरून त्यांच्यावर स्प्रे मारा. आता संपूर्ण केसांची एक एक बट घेऊन रोल करत केसांच्या एका साइटला सेट करा. त्यामुळे एक हटके आणि क्लासी लूक मिळण्यास मदत होईल.