(Image Credit : Beauty & Health Tips)
सुंदर आणि चमकदार दात तर सर्वांनाच हवे असतात. त्यामुळे अनेकजण टूथपेस्ट खरेदी करताना फार काळजीपूर्वक करतात. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट उपलब्ध आहेत. त्यात मीठ असलेलं टूथपेस्ट, मीठ नसलेलं टूथपेस्ट, व्हायटनिंग जेल्स यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टूथपेस्ट केवळ दातांसाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कशाप्रकारे टूथपेस्टने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.
फेसपॅक म्हणूण वापरा
(Image Credit : Just in Five Minutes)
टूथपेस्टचा वापर तुम्ही फेसपॅक म्हणूणही करू शकता. त्यासाठी सर्वातआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा आणि टूथपेस्टचा एक थर चेहऱ्यावर लावा. मानेवरही टूथपेस्ट लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी तशीच राहू द्या. याने चेहऱ्यावर थोडीशी जळजळ नक्कीच होईल, पण त्याचं टेन्शन घेऊ नका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतील, स्कीन टाइट होईल आमि चेहरा ग्लो करायला लागेल. टूथपेस्टमध्ये असलेल्या हर्बल गोष्टींमुळे जसे की, मध आणि लवंगमुळे चेहरा खुलतो.
ब्लॅकहेड्स दूर करा
ब्लॅकहेड्सही अनेकांना होणारी मोठी समस्या आहे. हे दूर करण्यासाठी तुम्ही पेस्ट वापरू शकता. यासाठी नाकावर पेस्टचा एक थर लावा. एका सॉफ्ट टूथब्रश घेऊन आणि पाण्याने भिजवून नाकावर हलक्या हाताने रब करा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवावा. तुम्हाला ब्लॅकहेड्स दूर झालेले दिसतील. तसेच याने स्कीनचे पोर्सही स्वच्छ होतील.
सनटॅन दूर करण्यासाठी फायदेशीर
व्हायटनिंग प्रॉपर्टी असलेले टूथपेस्ट सनटॅन दूर करण्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यासोबतच याने स्कीनवर ग्लो सुद्धा येतो. सनटॅन रिमुव्ह करण्यासाठी एका कपात थोड टूथपेस्ट, एका लिंबाचा रस टाकून मिश्रिण तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान, गळा, पायांना लावा. ही पेस्ट अर्धा तास तशीच लावून ठेवा नंतर चेहरा पाण्याने धुवा. तीन दिवस हा उपाय केल्यास फायदा दिसेल.
नखे क्लीन आणि चमकदार करण्यासाठी
नखे चमकदार करण्यासाठी टूथपेस्ट नखं आणि क्युटिकलवर चांगल्याप्रकारे लावा. हे लावून १५ मिनिटांसाठी तसंच ठेवा. ब्रशने क्युटिकल आणि नखं स्वच्छ करा.