Olive Oil आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतं. Olive Oil चा केवळ त्वचेसाठीच नाही तर पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठीही फायदा होतो. Olive Oil आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे हे अनेकांना माहीत नसतं. चला Olive Oil च्या अशाच काही फायद्यांबाबत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. पण असं असलं तरी या तेलाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केलेला अधिक चांगलं.
डाएट करणाऱ्यांसाठी
Olive Oil मध्ये तयार करण्यात आलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात जमा झालेली एक्स्ट्रा चरबी दूर होते. त्यामुळे डाएट करणारे किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक या तेलातील पदार्थ खाऊ शकतात.
बॉडी मसाज
(Image Credit : gumtree.com)
जर हिवाळ्यात तुम्ही रोज Olive Oil ने संपूर्ण शरीराची मसाज कराल तर याने तुम्हाला काही दिवसातच ग्लोईंग त्वचा मिळू शकते. इतकेच नाही तर तुमच्या त्वचेवरून वेगवेगळे डागही दूर होण्यास मदत मिळते.
पचनासाठी फायदेशीर
Olive Oil मध्ये भरपूर प्रमाणात फायदेशीर तत्व असतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, आयर्न, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. याने पोट साफ राहण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. सोबतच त्वचाही चमकदार होते.
पोटाची समस्या दूर करा
ज्या लोकांना सतत पोटासंबंधी काहीना काही समस्या होत राहतात, त्यांनी Olive Oil मधे तयार करण्यात आलेले पदार्थ खावे असा सल्ला दिला जातो. याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या होत नाही आणि पोट साफ राहतं.
चांगल्या डोळयांसाठी
(Image Credit : health.com)
अलिकडे डिजिटल स्क्रिनिंगमुळे तरूणांना डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत आहेत. खासकरून तरूण मोबाइलमध्ये अधिक व्यस्त असतात. जर तुम्हाला अशा काही समस्या असतील तर हलक्या हाताने डोळ्यांच्या आजूबाजूला Olive Oil ने मसाज करा. याने डोळ्यांचा थकवा आणि डार्क सर्कलही दूर होतील.
डोकेदुखी आणि केसांची समस्या
(Image Credit : medscape.com)
जर तुम्हाला डोकं जड वाटत असेल किंवा तुमचे केस रखरखीत झाले असतील तर या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी Olive Oil चा वापर करू शकता. Olive Oil ने मसाज कराल तर तुम्हाला फायदा होईल.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
अनेक तज्ज्ञ सांगतात की, Olive Oil चं नियमित सेवन केल्याने टाइप २ डायबिटीसच्या रूग्णांना आराम मिळतो. जे लोक या तेलाचं सेवन करतील ते या आजाराच्या जाळ्यात येण्याचा धोकाही कमी होतो.