खोकल्यावर अननसाचा ज्युस अधिक प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2016 4:38 PM
खोकल्यावर इलाज म्हणून कफ सिरपपेक्षा अननसाचा ज्युस अधिक प्रभावी आहे
आता पावसाळा सुरू होईल. उन्हाळ्याची दाहकता कमी होऊन वातावरणात थंडावा पसरेल. परंतु याबरोबरच सर्दी-खोकला यांसारखे विविध आजारदेखील डोके वर काढू लागतात.पण तुम्हाला माहित आहे का की, खोकल्यावर इलाज म्हणून कफ सिरपपेक्षा अननसाचा ज्युस अधिक प्रभावी आहे? आहो हसताय काय! खरंच अननसाचा ज्युस खोकल्यावर खूप परिणामकारक औषध आहे.अननसाचा ज्युसमध्ये मीठ, मीरपूड आणि मधाचे योग्य प्रमाण मिसळून पिणे कफ सिरपपेक्षा पाच पट अधिक गुणकारी असते असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे.अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे शक्तीशाली एन्झायम असते जे की, प्रोटिन वेगळे करून इन्फ्लेमेशन कमी करते. त्याबरोबरच हे एन्झायम घशाची चुरचुर आणि नाक व गळ्याची सूज घटवते. एवढेच नाही तर सायनसवर उपचार करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.म्हणून मग घरगुती, सोपा, कोणत्याही हानीकारक रसायनांशिवाय, स्वस्तातील अननसाचे ज्युस एक चांगला पर्याय आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी मॅग्नेशियम व मॅग्निज यांसारखी तत्वे आणि व्हिटॅमिन ए आणि ‘सी’चे विपूल प्रमाण यामध्ये असते.तसेच पोटॅशियम, कॉपर, कॅल्शियम, बिटा कॅरोटिन, थायमिन, बी-6, फोलेट तसेच द्रव्य आणि अद्रव्य फायबरने अननसाचे ज्युस परिपूर्ण असते.