Nose Hair Plucking : जास्तीत जास्त लोक हे शरीरावरील अनावश्यक केस काढण्यावर भर देतात. बरेच लोक नाकातील केसही खेचून काढतात किंवा कापतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, नाकातील केस काढणं फारच नुकसानकारक ठरू शकतं. कारण नाकातील केस हे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला नाकातील केस काढल्याने काय नुकसान होतात.
डेंजर ट्राएंगलचं नुकसान
आपल्या चेहऱ्याच्या एका भागाला डेंजर ट्राएंगल म्हटलं जातं. हा नाकाच्या वरपासून ते तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यांचा भाग असतो. यात रक्तवाहिन्या आणि तंत्रिका असतात. ज्या मेंदुमध्ये रक्तप्रवाह करतात. नाकातील केस कापल्याने रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि याने गंभीर नुकसान होतं. ज्या नसा नाकातून रक्त बाहेर नेतात, त्या मेंदुला रक्त पुरवठा करणाऱ्या नसांसोबत मिळून काम करतात. जेव्हा नाकातील केस खेचून काढले जातात तेव्हा तेव्हा किटाणू मेंदुपर्यंत पोहोचू शकतात आणि फंक्शन प्रभावित करू शकतात.
इन्फेक्शनचा धोका
नाकातील केस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचे असतात. हे श्वास घेताना सगळ्या गोष्टी फिल्टर करून आत पाठवतात. नाकातील केस कापल्याने किंवा काढल्याने इन्फेक्शनचा धोका होतो. जेव्हाही तुम्ही नाकातील केसा काढता तेव्हा फॉलिकल्सजवळचे किटाणू आणि कण फिल्टर न होताच आत जातात.
बॅक्टेरिया पसरण्याची भीती
नाकातील केस कापल्याने किंवा वॅक्स केल्याने रोमछिद्र बॅक्टेरिया आणि इतर किटाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळे नाकातील केस किटाणूची निर्मिती रोखू शकत नाही. यामुळे मेंदुपर्यंत बॅक्टेरिया पोहोचू शकतात.
नाकातील केस फायदेशीर
इन्स्टाग्रामवर या मुद्द्यावरून डॉक्टर करण राजन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात डॉक्टर म्हणाले की, आपल्या नाकात दोन प्रकारचे केस असतात. एक मायक्रोस्पोपिक सिलिया हेअर जे नाकाच्या आतील द्रव्य फिल्टर करतात आणि ते पुन्हा गळ्याकडे पाठवतात. तर मोठे पार्टिकल्स बाहेर येतात. डॉक्टर या जाड केसांना बाहेर काढण्यास मनाई करतात. डॉक्टर म्हणाले की, जर ते दिसायला चांगले दिसत नसतील तर खेचून काढण्याऐवजी कापून छोटे केले जाऊ शकतात. हे केस नाकात बॅक्टेरिया आणि जर्म्स जाण्यापासून रोखतात. जर ते काढले तर जर्म्स नाकात जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं.
नाकातील केस कसे कापावे?
जर तुमच्या नाकातील केस फार वाढले असतील आणि तुम्हाला ते काढायचे असतील ते खेचून तोडण्याऐवजी ट्रिम करा. याने जास्त नुकसानही होणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.