त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण एखादी छोटीशी चुकही त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. आहारात समतोल नसणं, धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पिंपल्स, डाग, ओपन पोर्स यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. ज्यामध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स त्वचेला नुकसान पोहोचवतात. अशातच तुम्ही त्वचेसाठी डाळिंबापासून तयार करण्यात आलेलं टोनर वापरू शकता. कारण टोनरमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे त्वचेवरील मृत पेशी दूर करून त्वचा उजळवण्यासठी आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात.
त्वचेसाठी लाभदायक ठरतं डाळिंब
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अॅन्टी-एजिंग गुणधर्म असतात. जे वाढत्या वयाच्या लक्षणांना कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. डाळिंबातील अॅन्टी-ऑक्सिडंट त्वचेच्या समस्या म्हणजेच, त्वचेवरील सूज, जळजळ, खाज आणि लालसरपणा दूर करण्याचे काम करतात. तसेच त्वचेवरील डाग कमी करण्यासाठीही उपयोगी ठरतात. डाळिंबामध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात. जे त्वचेची रंगत वाढविण्यासाठी आणि त्वचेच्या कोलेजनची पातळी बुस्ट करण्याचे काम करतात.
टोनर तयार करण्याचे साहित्य :
- 1/2 डाळिंब
- 1/2 कप पाणी
- 1 ग्रीन-टी बॅग
- 1 चमचा गुलाब पाणी
असं तयार करा डाळिंबापासून टोनर :
- एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि ते थोडा वेळ गरम करण्यासाठी ठेवा.
- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये ग्रीन-टी बँग टाका आणि 2 मिनटांसाठी तसचं ठेवा.
- आता पाणी थंड करून घ्या आणि त्यामध्ये थोडं गुलाब पाणी एकत्र करा.
- आता डाळिंबाचे दाणे काढून त्यांचा ज्यूस तयार करा आणि त्या पाण्यामध्ये एकत्र करा.
- तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ओतून ठेवा.
- डाळिंबापासून तयार केलेलं घरगुती टोनर वापरण्यासाठी तयार आहे.
असं वापरा टोनर :
तयार टोनर कापसावर घेवून आपला चेहरा आणि मानेवर लावा किंवा स्प्रे करा. त्यानंर हलक्या हाताने मसाज करून तसचं ठेवा. चेहऱ्याची स्किन हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी तयार करण्यात आलेलं टोनर वापरू शकता. यामुळे त्वचेला पोषण मिळण्यासोबतच त्वचा तजेलदार होण्यासही मदत होईल.