ट्रेकिंगच्या आनंदाबरोबरच सावधगिरीही आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2016 3:52 PM
या हंगामात ट्रेकिंग करण्यासाठी अनेकजण बाहेर पडून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात.
पावसाळा म्हटले तर आल्हाददायक वातावरण. त्यामुळे या हंगामात ट्रेकिंग करण्यासाठी अनेकजण बाहेर पडून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. हा आनंद आवश्य लुटा परंतु, धोक्याची व अवघड ठिकाणी पार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा ट्रेकिंग आपल्या जीवावरही बेतू शकते. तसेच अलीकडे आलेल्या सेल्फी फॅडचा मोह हा सुद्धा धोक्याची ठिकाणी टाळावा. ट्रेकिंग करताना अशी घ्या काळजी ट्रेकिंगच्या ठिकाणी आपण नवीन असतो, तेथे काय धोका आहे. हे आपल्याला माहिती नसते. त्याकरिता स्थानीक नागरिकांचा सूचनाचा मान ठेवावा. त्यामुळे धोका होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला राहत नाही. त्याकरिता ज्यांना माहिती आहे, अशा एखादा व्यक्तिला सोबत घ्यावे. रात्रीचा मुक्काम हा शक्यतो उघड्या व निर्जनस्थळी करणे टाळावा. त्याऐवजी एखादा मंदिरात किंवा तंबू ठोकून मुक्काम करावा. डोंगरामध्ये वाहत्या पाण्याची खोली आपल्याला माहिती राहत नाही. त्यामुळे त्याचा आनंद घ्यावा. परंतु, त्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करु नका. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ट्रेकिंगला पायात चप्पल किंवा सँडलऐवजी रबरी बूट घालावा, त्यामुळे दुखापत होत नाही. ज्यांच्यासोबत आपण ट्रेकिंगला जाणार आहोत, त्यांच्यातील एका जणांचा मोबाईल क्रमांक घरी देऊन ठेवावा. परत कधी येणार हे सुद्धा अंदाजाने सांगून ठेवावे. मद्यपान, धिंगाणा, आणि कर्णकर्कश गाणी ट्रेकिंगदरम्यान टाळावा. पावसाळ्यात डोंगरातील सर्व वाटा या निसरड्या झालेल्या असतात. त्यामुळे जास्त उतार व उंच कडा असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. पाण्याच्या धबधब्याजवळ जातानाही पाय घसरण्याची मोठी भिती असते. त्याकरिता पाण्याच्या अतिजवळ जाणे टाळावे. ट्रेकिंग करताना कधीही इतराशी स्पर्धा करु नये. व इतरांना हिणवूही नाही. एखादा ठिकाणी चिखलामुळे किंवा अन्य कारणामुळे चालणे अवघड होत असेल तर माघारी फिरावे. तसेच निसर्गाचा वातावरणाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच ट्रेकिंग दरम्यान फाजील आत्मविश्वास टाळावा. असा आत्मविश्वास हा जीवावर बेतणारा असतो. सोबत मेडिटेशन किट ठेवावी. स्वयंपाक करण्याचे साहित्यही सोबत ठेवावे. सेल्फीचा मोहसेल्फी फॅड हे अलीकडे मोठ्या प्रमाणात आले आहे. ट्रेकिंगला गेल्यावर आठविण्यासाठी सेल्फी जरुर घ्यावा. परंतु, तो घेत असताना आपल्याला जीवाला धोका होईल, अशा ठिकाणी सेल्फी घेऊ नये. किल्याच्या शेवटच्या टेकावर, खोल दरीत, पाण्यात अशा धोकादायक ठिकाणी मोह आवरावा. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध पण धोकादायक ठिकाणेचंदेरी किल्या : हा किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. पावसाळ्यात दगड पडण्याचा मोठा धोका आहे. वरती जाणारा रस्ता हा अत्यंत अरुं द आहे. नवख्यांना या किल्यावर जाण्याचा प्रयत्न करु नये. चिंचोटी धबधबा : हा धबधबा सुद्धा धोक्याचा असून, येथे पाण्याच्या प्रवाहाचा व कुंडाचा आवाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. पांडवगड : ट्रेकिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. परंतु, अनेक दुर्घटना झाल्याने येथे बंदी घालण्यात आलेली आहे. कुंडेश्वर धबधबा : पावसाळा सुरु झाली की, अपघात होतोच अशी या धबधब्याची ओेळख बनली आहे. या कुंडाच्या आतमध्ये कपारी आहेत. याची सूचनाही दिली जाते, परतु, अतिआत्मविश्वासाने करुन अनेकजण आपले जीव गमवून बसतात. बुशी धरण : या धरणात अतिउत्साही पर्यटक मद्यपन करुन धरणाच्या पाण्यात उड्या मारतात. खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. तरुणाईच्या आवडीचे हे एक ठिकाण आहे. परंतु, धोक्याचे ठिकाण म्हणूनही त्याला ओळखले जात आहे. माळशेज घाट : या ठिकाणी मोठमोठे धबधबे आहेत. घाटात रस्त्याच्या कडेला आनंद लुटताना अनेक अपघात झालेले आहेत. रस्त्याच्या एका बाजूची दरी ही खूप खोल आहे. राजमाची : या वाटेवर घनदाट जंगल आहे. रस्ता माहित नसल्याने येथे अनेक अपघात झालेले आहेत. मुळशी - ताम्हिणी परिसर : हा परिसर खूपच नयनरम्य आहे. परंतु, मद्यपी पर्यटकांच्या धिंगाणामुळे फार कमी जण कौटुंबिक सहलीसाठी येथे जातात. तसेच या परिसरात लुटण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक परिसर म्हणून त्याची ओळख बनली आहे. ------------------------------