त्वचेपासून संरक्षण करण्यासाठी करा या उपाययोजना....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2016 5:59 PM
त्वचेपासून संरक्षण करण्यासाठी करा या उपाययोजना.... वयात आल्यानंतर तोंडावर येणाºया तारुण्यपिटीका आणि काळे चट्टे यांच्याशिवाय सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचीही भीती असते. भारतामध्ये कृष्णवर्णीय त्वचेचे लोक अधिकतर दिसून येतात. केसांचे अधिक असणारे प्रमाण यामुळे काही प्रमाणात त्वचेला संरक्षण मिळते, त्याचप्रमाणे त्वचा रापण्यापासून रोखते. याबाबत सांगताहेत आंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-माखिजा.
वयात आल्यानंतर तोंडावर येणाºया तारुण्यपिटीका आणि काळे चट्टे यांच्याशिवाय सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचीही भीती असते. भारतामध्ये कृष्णवर्णीय त्वचेचे लोक अधिकतर दिसून येतात. केसांचे अधिक असणारे प्रमाण यामुळे काही प्रमाणात त्वचेला संरक्षण मिळते, त्याचप्रमाणे त्वचा रापण्यापासून रोखते. याबाबत सांगताहेत आंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-माखिजा.ज्यावेळी आपण त्वचेच्या संरक्षणाचा विचार करतो, सनस्क्रीन हे गरजेचे असते. नवे सनस्क्रीन विशेषत: हाय आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अल्ट्राव्हायोलेट (युव्ही) संरक्षण पुरविते. त्याशिवाय उष्णतेमुळे होणारी आग, त्याचप्रमाणे अतिनील किरणांपासून रापणारी त्वचा रोखण्याचे काम करते.चांगला परिणाम दिसून येण्यासाठी योग्य सनस्क्रीनचा वापर करा आणि दिवसातून किमान दोनवेळा याचा वापर करणे आवश्यक आहे. तुमच्या लाईफस्टाईल आणि व्यवसायाला अनुरुप सनस्क्रीन लावले पाहिजे. सनस्क्रीनचा एसपीएफ फॅक्टर तुमची त्वचा प्रखर सूर्यप्रकाशापासून किती वेळ तग धरु शकते हे सांगतो. उदाहरणार्थ एसपीएफ २० म्हणजे सुमारे २०० मिनिटे संरक्षण. भारतामध्ये सर्वसाधारणत: एसपीएफ २० हा उत्तम आहे. जे लोक सातत्याने बाहेर फिरतात त्यांच्यासाठी एसपीएफ ३० ते ४५ वापरणे योग्य ठरते.सनस्क्रीन हे जेल किंवा क्रीमच्या स्वरुपात मिळते. आपली त्वचा कशापद्धतीची आहे, त्यानुसार तुम्ही सनस्क्रीन वापरु शकता. तुमची त्वचा जर तैलीय किंवा तेलकट स्वरुपाची असेल, तर तुम्ही जेल स्वरुपाचे आणि तुमची त्वचा जर कोरड्या स्वरुपाची असेल, तर क्रीम स्वरुपाचे सनस्क्रीन वापरा. तुम्ही जर पोहत असाल तर जलतरण तलावाबाहेर आल्यानंतर पुन्हा हे सनस्क्रीन लावले पाहिजे.ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी छत्रीचा वापर करा. त्याशिवाय लांब आकाराची हॅट आणि संरक्षित लाँग स्लीव्हचा सनस्क्रीनसह वापर करा. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी तुम्ही ४८ तासांपेक्षा अधिक काळ बाहेर जाणार असाल आणि तुम्ही स्कीन ट्रीटमेंट उदा. फेशिअल किंवा क्लीनअप्स केले असेल तर तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो.त्वचा रापण्यापासून संरक्षणाची घरगुती काळजीलिंबाचा रस आणि ग्लिसरीन यांचे मिश्रण करा. वांग आणि काळसर डागासाठी ते उपयुक्त आहे.अॅलोव्हेरा (कोरफड) जेलचा वापर करा. यामुळे उष्णता आणि रापणाºया त्वचेला मोठी मदत मिळते.सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेवर ओरखडे पडले असतील तर कॅलॅड्रीलचा वापर करा.रापलेल्या त्वचेसाठी दही आणि चुना एकत्र करून १० मिनिटे ठेवा. आंघोळीपूर्वी तो लावा. नैसर्गिक ब्लिचिंगसारखा याचा वापर करता येतो.त्वचा रापण्यापासून संरक्षणासाठी तुम्ही घरीच उपाय करू शकता. एक चमचा दुधाची पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा लिंबू सरबत आणि मधाचे काही थेंब एकत्र करा. याची पेस्ट करा आणि आठवड्यातून दोनदा याचा वापर करा. १० मिनिटे ती ठेवा.फाउंडेशन आणि कॉम्पक्टचाही वापर करता येतो. एक गोष्ट लक्षात घ्या, सायंकाळी मात्र तुमचा चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे.प्रखर सूर्यप्रकाशाचा परिणाम म्हणजे क्रोज इफेक्ट. उदाहरणार्थ डोळ्याभोवती पडणाºया सुरकुत्या. योग्य प्रकारचा गॉगल घालून तुम्ही त्यापासून संरक्षण मिळवू शकता.चांगली त्वचा ही सौंदर्याचा पाया आहे, असे म्हटले जाते. तुमची त्वचा तुमचे सौंदर्य वाढविते. त्यामुळे त्वचेचे योग्य संरक्षण करून तुम्ही अधिक तरुण आणि आकर्षक दिसू शकता.