भावा-बहिणींचा दिवस म्हणजे, रक्षाबंधन. यावर्षी 15 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीला तिचं सदैव रक्षण करून प्रत्येक बाबतीत तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं वचन देतो. भावांपेक्षा बहिणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हा दिवस खास करण्यासाठी तयारी करत असते .
रक्षाबंधनाच्या दिवशी खास लूक कॅरी करण्यासाठी आपल्या आउटफिट्सपासून ते मेकअप, हेअरस्टाइल आणि अगदी मेहंदीपर्यंत त्या सर्व आवर्जुन करतात. रक्षाबंधनाच्या दिवसासाठी सिंम्पल आणि क्लासी अशा अरेबिक डिझाइन्सना अनेक मुली पसंती देतात. तुम्ही बाजारातून मेहंदीचा कोन आणून घरीच काही डिझाइन्स पाहून मेहंद काढू शकता.
आम्ही तुम्हाला काही ट्रेन्डी मेहंदी डिझाइन्सचे ऑप्शन्स सांगणार आहोत. पाहूयात डिझाइन्सचे ट्रेन्डी ऑप्शन्स...
रक्षा बंधनाचा दिवस बहिणींसाठी खास असतो. या दिवसासाठी तुम्ही आधीपासूनच मेंहदी डिझाइन्स पाहून ठेवल्या तर तुमचा गोंधळ उडणार नाही. या दिवसांमध्ये राजस्थानी, अरबी, फ्लोरल, वेल, मोरक्कन मेहंदी डिझाइन, बॅकहॅन्ड मेहंदी डिझाइन्स, मिनिमलिस्ट मेहंदी डिझाइन्स इत्यादी प्रचंड ट्रेन्डमध्ये आहे. आपल्या हातासोबतच तुम्ही पायांवरही अनेक फॅन्सी डिझाइन्स ट्राय करू शकता.