फोटो क्रेडिट : बँकॉग डे स्पा
चमकदार त्वचा (skincare) मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. तुम्ही ते केलेलेही असतील. पण याचा तुम्हाला किती लाभ झाला? आता आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत ज्यांनी एका रात्रीत तुमचा चेहरा उजळेल. यामध्ये घरगुती फेसपॅक वैगरे असं काही नाही. यातील एक उपाय जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला याचे परीणाम आपोआप जाणवतील.
लॅक्टिक अॅसिडझोपण्यापुर्वी लॅक्टिक अॅसिड लावणे फायद्याचे आहे. या मुळे तुमचा चेहरा एका रात्रीत उजळू शकतो. लॅक्टिक अॅसिड ७ ते ८ तासांत आपलं काम पूर्ण करते. त्याचमुळे अनेक उत्पादनांनमध्येही लॅक्टिक अॅसिडचा समावेश असतो. लॅक्टिक अॅसिड लावल्यावर तुमच्या त्वचेवरील छिद्र टाईट होतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते.
व्हिटॅमीन इ-फेस सिरमत्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन इ ची फार गरज असते. हे सिरम रात्री लावावे. सकाळी उठल्यावर चेहऱ्यात झालेला फरक तुमच्या चटकन लक्षात येईल. हे महिनाभर वापरल्यान तुमची त्वचा आणखी फ्रेश वाटू लागेल.
केरामाईड्सउन्हाळ्यात जर तुमची त्वचा कोरडी होत असेल तर केरामाईड्स तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल, काळे डाग लगेच दिसत असतील. केरामाईड्स सोबत जर ग्लिसरीन आणि फॅटी अॅसिड्स असणारी स्किन केअर प्रोडक्ट वापराल तर चेहरा अधिक उजळेल.
सी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन जसे कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेचे आहे तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र हे रात्री वापरल्यावर सकाळी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे. कारण उन्हाच्या संपर्कात आल्यावर या व्हिटॅमिन सी चा काहीही फायदा होणार नाही.