केसांना काळे करणे असो वा वेगळा कलर करणे असो यासाठी हेअर डायचा वापर होतो. हेअर डाय हा लूक बदलण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. पण अनेक हेअर डायमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता असते. या केमिकल्समुळे त्वचेवर लाल डाग, पुरळ, रॅशेज येतात. हेअर डायमुळे त्वचेहा होणाऱ्या अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय करु शकता.
अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरा म्हणजेच कोरफडीचं जेल वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात, त्यामुळे अॅलर्जी सहजपणे दूर करता येते. या जेलने हेअर डायमुळे येणारी खाज आणि सूज दूर होते. त्यासोबतच अॅलोवेरा केसांसाठीही फायदेशीर आहे.
टी-ट्री ऑईल
जर हेअऱ डायमुळे तुम्हाला डोक्याच्या त्वचेला खाज येत असेल तर तुम्ही टीट्री ऑईलचा वापर करु शकता. अनेक वर्षांपासून टी ट्री ऑईलमधील अँटी-बॅक्टेरिअल गुणांचा वापर अॅलर्जीमुळे होणारी खाज, लाल चट्टे आणि सूज दूर करण्यासाठी केला जातो.
कडूलिंबाची पाने
कडूलिंबामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल तत्व असल्याने याने वेगवेगळे आजार दूर केले जाऊ शकतात. अॅलर्जी दूर करण्यासाठी कडूलिंबाची काही पाने ६ ते ७ तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर ३० मिनिटे लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.
दही आणि लिंबू
लिंबाच्या रसामध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅस्ट्रिजेंट गुण असतात. लिंबाच्या रसाचा वापर अॅलर्जीच्या उपायासाठीही केला जातो. याने अॅलर्जी दूर करण्यास मदत होते. हदी आणि लिंबाचा रस डोक्याच्या त्वचेवर लावा किंवा इतर त्वचेवर लावा.
तुळशीची पाने आणि लसूण
त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काळे मिरे असलेला पॅकही फायदेशीर ठरतो. हा तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने बारीक करा. त्यात एक चमचा ऑलिव्ह आईल, लसणाच्या दोन कळ्या, एक चिमुट मीठ आणि एक चिमुट काळ्या मिऱ्याची पावडर टाका. हे मिश्रण लावल्याने फायदा होईल.
टिप : हे घरगुती उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण यातील काही वस्तूंची किंवा पदार्थांची काही लोकांनी आधीच अॅलर्जी असू शकते. अशात परिस्थीती आणखी गंभीर होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.