नेहमीच महिला चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे हैराण झालेल्या असतात. महिलाच्या चेहऱ्यावरील या केसांना मेडिकल भाषेक हिरसूटिज्म असे म्हटले जाते. यात महिलांच्या केसांची वाढ ही पुरुषांच्या केसांप्रमामे होते. हे तरुणपणात अधिक होतं. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्या काय आहेत हे खालीलप्रमाणे बघुयात....
प्लकिंग, वॅक्सिंग
चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी जनरली प्लकिंग, वॅक्सिंग आणि इतरही केमिकल्सचा आधार घेतला जातो. प्लकिंगच्या माध्यमातून जेव्हा चेहऱ्यावरील संवेदनशील भागातील केस दूर केले जातात तेव्हा केसांच्या मुळात इन्फेक्शन सोबतच पिपल्स आणि इतरही समस्या होऊ शकतात. यासाठी जर वॅक्सिंगचा वापर केला गेला जकर गरम वॅक्स त्वचेच्या केसांच्या मुळात जाऊन त्वचेमध्ये खाज निर्माण करु शकतं.
रासायनिक तत्त्वांचा वापर
दुसऱ्या रासायनिक तत्वांच्या आधारे जेव्हा चेहऱ्यावरील केस दूर केले जातात तेव्हा यात असलेल्या सल्फरमुळे केसांची मुळं कमजोर होतात. याने केसगळती होऊ शकते. याने चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर खाज येऊ शकते आणि या केमिकल्सच्या वापराने त्वचा लालही होते. तसेच चेहऱ्यावरही काही डागही येऊ शकतात. अशावेळी चेहऱ्यावरील केसांची समस्या गंभीर होऊ शकते.
लेजर ट्रिटमेंट
आजकाल चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी लेजरचा आधार घेतला जातो. लेजर चेहऱ्याच्या केसांच्या मुळात जाऊन त्यांचा रंग बदलवतो. पण सावळी त्वचा असलेल्या महिलांना याचा काहीही फायदा नाही. गोरी आणि काळी त्वचा असलेल्या महिलांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी कोणत्याही तंत्राचा वापर करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण या प्रक्रियेमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं.
फोकिकल्स एंड्रोजन्स हार्मोन
चेहऱ्यावरील केस दूर करण्यासंबंधी चांगला रिझल्ट हवा असेल एखाद्या ट्रायकोलॉजिस्टला संपर्क करा. चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची सर्वात मोठी समस्या ही केसांच्या फोलिकल्स एंड्रोजन्स नावाच्या हार्मोनचं अधिक प्रमाण हे आहे. हार्मोन औषधे आणि एंड्रोजन, स्टिरोराइडच्या वापराने असे होते.