वेल-ग्रूम्ड आणि निरोगी राहण्यासाठी संपूर्ण शरीर स्वच्छ करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की, म्हणून तर दररोज आंघोळ करतो. पण आपण दररोज आंघोळ केली तरी शरीराचे असे काही अवयव आहेत जे आंघोळ केल्यानंतरही व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. जाणून घेऊया आपण नक्की काय चुका करतो त्याबाबत...
चेहरा
चेहरा स्वच्छ करणं अत्यंत सोप काम आहे. परंतु आपण सगळेच याबाबत चुका करतो. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करण्यावर भर देण्यात येतो. परंतु झोपून उठल्यानंतर चेहरा धुणं गरजेचं असतं. कारण उशीच्या कव्हरवर असलेले बॅक्टेरिया रात्रभर आपल्या त्वचेवर चिकटतात. ज्यामुळे स्किन ब्रेकआउट्स आणि स्किन डॅमेज यांसारख्या समस्या होतात. याव्यतिरिक्त फेसबॉशचा जास्त वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. त्यामुळे दिवसातून दोनच वेळा फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुतल्यानंतर हलका ओला असतानाच मॉयश्चरायझर लावा.
स्काल्प
केस धुताना आपण अनेकदा केसांवर लक्ष देतो आणि केसांनाच शॅम्पू लावतो. ज्यांचे केस लांब आणि दाट असतात त्यांच्याबाबत हे जास्त होतं. असं करणं हिच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण आपण केस धुताना वापरलेला शॅम्पू केसांमधून व्यवस्थित काढू शकत नाही. जर तुमचे केस लांब आणि दाट असतील तर स्काल्प स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या. व्यवस्थित शॅम्पू लावल्यानंतर शॉवर किंवा पाण्याच्या मदतीने शॅम्पू व्यवस्थित स्वच्छ करा. कंडिशनर अनेकदा स्काल्पमध्ये तसचं राहतं. त्यामुळेही केसांना नुकसान पोहोचतं.
दात
तुम्ही कितीही चांगला मेकअप केला किंवा लिपस्टिक लावली तरी तुमचे दात पिवळे असतील तर तुमचं सर्व इम्प्रेशन डाउन होतं. कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जास्तीत जास्त लोकांना दात स्वच्छ करण्याची पद्धत माहितच नसते. योग्य पद्धत म्हणजे, ब्रशला दातांनी 45 डिग्री अॅगलमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने ब्रश फिरवा. सर्कुलर मोशनमध्ये प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. हार्ड ब्रशचा वापर करू नका. फ्लॉस आणि टंग क्लिनिंग करायला विसरू नका.
बेली बटन (पोटाची बेंबी)
संपूर्ण शरीराची स्वच्छता करताना आपण अनेकदा बेली बटनकडे दुर्लक्ष करतो. येथे सर्वात जास्त बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. बेली बटन स्वच्छ करण्यासाठी हाताच्या बोटाऐवजी कॉटन वर्डचा वापर करा.
कान
लोक कान स्वच्छ करताना कानाच्या मागील बाजूस स्वच्छ करणं विसरतात. येथे असलेला मळ आणि घाण तुमचं इम्प्रेशन खराब करतं. लक्षात ठेवा कानाच्या आतमध्ये जास्त स्वच्छता करण्याची गरज नसते. कानाच्या बाहेरील बाजूस स्वच्छता करा. कानाचे साइड्स आणि बॅक साइड स्वच्छ करा.
टिप : वरील सर्व माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.